धनगर आरक्षणासाठी एकाची आत्महत्या
मुंबई : पोलिस कोठडीत आत्महत्या करणे असे प्रकार आता अनेकदा घडल्याचे पाहिला मिळत आहे. त्यातच आता एका आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या करून जीवन संपवलं. अंकित राय (वय २६) असे या आरोपीचे नाव आहे. अंकित राय याने सहार पोलिस ठाण्याच्या कोठडीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
अंकित राय आत्महत्या प्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखेने सखोल तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे पोलिस कोठडीत सुरक्षा आणि मानक प्रक्रियांमध्ये संभाव्य त्रुटींबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबई गुन्हे शाखेने हे प्रकरण ताब्यात घेतले आहे आणि लॉकअपची देखरेख व्यवस्था, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड आणि कोठडी प्रोटोकॉलचे पालन याची बारकाईने तपासणी करत आहे. निष्काळजीपणा किंवा गैरप्रकाराची शक्यता देखील नाकारता येत नाही.
रूममेटचा मोबाईल चोरीचा आरोप
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करणारा अंकित राय हा चार-पाच मित्रांसह राहत होता. अंकितवर त्याच्या रूममेट्सचे मोबाईल फोन चोरल्याचा आरोप होता. अलीकडेच पाच मोबाईल फोन बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाली होती. त्यापैकी तीन मोबाईल फोन अंकितकडून जप्त करण्यात आले होते, ज्याच्या आधारे सहार पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतर अंकितला सहार पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. जिथे त्याने टॉवेलने गळफास घेऊन मृतावस्थेत आढळला होता.
पोलिस कोठडीत टॉवेल गेला कसा?
अंकितने पोलिस कोठडीतच टॉवेलने गळफास घेत आत्महत्या केली. अशाप्रकारे आत्महत्या झाल्याने एकच सवाल उपस्थित केला जात आहे. असे असताना पोलिस कोठडीत टॉवेल गेलाच कसा? असा प्रश्न केला जात आहे.
उत्तर प्रदेशात तरुणाची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, उत्तरप्रदेश येथील सहारनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने पत्नीच्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गळफास लावलेल्या तरुणाचे नाव सौरभ असे आहे. सौरभचे लग्न पाच वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना चार वर्षांचा एक मुलगाही आहे.