उरुळी कांचन: उरुळी कांचन येथील पुणे सोलापूर महामार्गावरील गजबजलेल्या वस्तीत असलेल्या दोन मोबाईल शॉपीवर अज्ञात चोरट्यांनी आपला मोर्चा वळवत शॉपीचे शटर उचकटून ती फोडून, त्यामधून तब्बल ७५ लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला आहे. ही घटना गुरुवारी पहाटे चार च्या सुमारास घडली आहे. माणिक मोबाईल शॉपी व कॉर्नर मोबाईल शॉपी या दोन मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडल्या आहेत. या दोन्ही दुकानांमध्ये असलेले विविध कंपन्यांचे ब्रॅण्डेड मोबाईल फोन यांची अंदाजे किंमत ७५ लाख किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
उरुळी कांचन परिसरात गेल्या १५ दिवसात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रोहन उत्तम थोरात व संदेश पोपट गाडे यांनी उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या कॉर्नर मोबाईल शॉपी मधून सॅमसंग, ओप्पो, विवो, मोटोरोला, आयफोन, लावा, रेडमी, आयटेल, वन प्लस, रियल मी असे एकूण १५४ मोबाईल, १९,४९९ रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा टॅबलेट, २१२०४ वेगवेगळ्या कंपनीच्या ॲक्सेसरीज, ९३५०० रोख रक्कम असा एकूण ३५,८०,९०५ रुपये किमतीचा माल चोरून नेला आहे.
माणिक मोबाईल शॉपी मधून चोरीस गेलेल्या मालाचे वर्णन व किंमत पुढीलप्रमाणे –
Pune Theft : चोरट्यांनी वाघोलीत फ्लॅट फोडला; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास
चोरट्यांनी वाघोलीत फ्लॅट फोडला
वाघोली भागात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून ७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. चोरट्याने दरवाज्यावर ठेवलेली चावी घेऊन कुलूप उघडले आणि चोरी केली. चोरटा माहिती असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार वाघोलीतील काळूबाईनगर येथील ‘अश्विनी रेसीडन्सी’ सोसायटीत राहायला आहेत. त्या १७ जून रोजी दुपारी बंद करुन कामानिमित्त घरातून बाहेर पडल्या. त्यांनी फ्लॅटची चावी दरवाज्याजवळ ठेवली होती. चावी ठेवलेल्या जागेची माहिती महिलेच्या कुटुंबीयाना असते. त्यामुळे महिला नेहमी दरवाज्याजवळ असलेल्या जागेत चावी ठेवायची. चोरट्याने दरवाज्याजवळ ठेवलेली चावी घेऊन फ्लॅटचे कुलूप उघडले. बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटा पसार झाला.