
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
घडलेली घटना अहिल्यानंगर जिल्ह्यातील मिरजगाव (ता. कर्जत) येथील आहे. या प्रकरणातील मृतकाचे नाव बापू आनंदा गाढवे (वय 60) असे आहे. तर आरोपी मुलाचे नाव आकाश बापू गाढवे आणि जावई सुनील रामदास राठोड असे आहे. 5 मार्च 2026 रोजी आकाश बापू गाढवे याने आपले वडील बापू गाढवे हे बेपत्ता असल्याची तक्रार मिरजगाव पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना आरोपी आकाश गाढवे याच्यावर संशय बळावला. त्याला पॉलिसी खाक्या दाखवताच त्याने मृताच्या जावई सुनील राठोड आणि इतर नातेवाईकांच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली.
त्यांनतर आरोपी सुनील राठोड हा शेगाव येथे लपला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे छापा टाकला. यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात सुनील राठोड इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने जखमी झाला, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
Ratnagiri Crime: संतापजनक! रत्नागिरीत अल्पवयीन मुलावर अत्याचार; कृत्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
कशी केली हत्या?
मृतक बापू गाढवे हे आपली शेतजमीन विकण्यास विरोध करत होते. याच रागातून 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी दीडच्या सुमारास मुलगा आकाश, सून पायल ऊर्फ आकांक्षा आणि जावई सुनील राठोड यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने बापू गाढवे यांचे तोंड दाबून व गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घराशेजारील लाकडे गोळा करून डिझेलच्या साहाय्याने मृतदेह जाळून टाकला. याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी एका हत्येची कबुली
यांनतर तपासादरम्यान आणखी एका हत्येची त्यांनी कबुली दिली. आरोपी सुनील राठोड याचे शीतल लिंबाजी सोंगेवाड (रा. परभणी) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते.
शीतल ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने त्याने 16 नोव्हेंबर 2025 रोजी तिची हत्या केली. त्यांनतर तिचा मृतदेह अकोला जिल्ह्यातील धनेगाव (ता. बाळापूर) परिसरात अर्धवट जाळून टाकला.
गुन्हा दाखल
पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. फरार आरोपींचा शोध सुरु आहे. दिलेल्या कबुलीने बाळापूर पोलीस ठाण्यातील खुनाचा गुन्हाही समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करत आहे.
Beed Crime: ‘बाजूला हो’ म्हणल्याचा राग; बीडमध्ये हॉटेल वेटरला अमानुष मारहाण, CCTV समोर
Ans: ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथे घडली.
Ans: शेतजमीन विकण्यास विरोध केल्याच्या रागातून मुलगा, सून आणि जावयाने मिळून हत्या केली.
Ans: मुख्य आरोपीने चौकशीत अकोला जिल्ह्यातील आणखी एका तरुणीच्या खुनाची कबुली दिली.