
crime (फोटो सौजन्य: social media)
Sindhudurg crime: कणकवलीत धक्कादायक प्रकार! युवक-युवतीने धरणात उडी घेऊन उचलले टोकाचे पाऊल
काय घडलं नेमकं?
४ डिसेंबर रोजी संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात मुळा नदीच्या पात्रात एका बाळाचा मृतदेह तरंगतांना दिसल्याने नागरिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. पोलिसांनी या बाळाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरु केला. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि घारगाव पोलीस याप्रकरणाचा समांतर तपास सुरु केला.
व्हिलेवात लावण्यासाठी वापरण्यात आलेली कार ही जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील असल्याचे समोर आले होते. पोलीस पथक भोकरदन येथे जाऊन आरोग्य केंद्र, आशा सेविका आणि गोपनिय माहितीचे आधारे तपास केला. पोलिसांनी या कारच्या मालकाकडे जाऊन चौकशी केली. त्यानंतर या बाळाच्या आई- वडिलांकडे संशयाची सुई गेली. पोलिसांनी बाळाचे वडील प्रकाश पंडित जाधव ( वय.३७, रा. भिवपूर, ता. भोकरदन, जि. जालना), आई कविता प्रकाश जाधव (वय ३२) तसेच गाडी चालक हरिदास गणेश राठोड (वय ३२, रा. आव्हाणा, ता. भोकरदन, जि. जालना) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करत त्यांनी या बाळाची हत्या केल्याचे सांगितले. बाळाचे नाव शिवांश प्रकाश जाधव असे.
का केली हत्या?
शिवांशची हत्या तिच्या आईवडिलांनी केल्याची कबुली दिली. शिवांशला असाध्य आजार होता. याला अनेक डॉक्टरांना दाखवण्यात आले. परंतू बहुतेक डॉक्टरांनी हे बाळ पूर्ण बरे होणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे आजाराने ग्रस्त असलेल्या बाळाचाच गळा दाबून त्याचा खून केला गेला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात मुळा नदीच्या पुलाखाली या बाळाच्या अंगावरील कपडे काढून त्याला नग्नावस्थेत नदीच्या पुलाखाली फेकण्यात आले आणि पालक पसार झाले.
अफवा काय पसरवली?
कविता जाधव शिवांशची आई हिने नातेवाईकांना त्यांच्या बाळाचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑपरेशन झाले असून त्यास ३ ते ४ दिवसांमध्ये रुग्नालयातून सोडणार असल्याची अफवा पसरविली.
Ans: मुळा नदीच्या पुलाखाली, घारगाव शिवार परिसरात.
Ans: मृतदेह सापडल्यानंतर कारचा मागोवा घेत पोलिसांनी पालकांपर्यंत पोहोचून चौकशीत सत्य बाहेर आणले.
Ans: बाळाला असाध्य आजार होता, उपचार निष्फळ असल्याचे सांगत त्यांनी गळा घोटून खून केला व नदीत फेकले.