मृत तरुणाचे वय २२ वर्षे तर तरुणीचे वय १८ वर्षे आहे. दोघेही रात्रीच्यासुमारास धरणाच्या दिशेने गेल्याचे स्थानिकांना दिसले होते. मात्र पहाटेच्या वेळी धरणाजवळ काही संशयास्पद वस्तू ग्रामस्थांना दिसले. याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम सुरु केले तेव्हा पाण्यात दोघांचा मृतदेह आढळून आला आहे.
आत्महत्या करण्यामागचं कारण काय?
तरुण आणि तरुणीने आत्महत्या का केली? यामागचं कारण काय? याबाबत अद्यापही कळू शकले नाही आहे. मात्र प्राथमिक तपासात प्रेमसंबंधांची शक्यता पोलिसांनी व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांकडून चौकशी सुरू असून काही वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, अशीही चर्चा सुरू आहे. पोलीस तपास करत असून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून पुढील तपास कणकवली पोलिसांकडून सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कणकवली तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय.
शिकार बनला शिकारी! अंदाज चुकला आणि गोळी थेट तरुणाच्या छातीत; २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
सावंतवाडी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सावंतवाडी येथील ओवळीये जंगल परिसरात रानडुक्कराच्या शिकार मोहिमेदरम्यान एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार सकाळी उघडकीस आली. सचिन सुभाष मर्गज असे मृतकाचे नाव असून तो मूळचा सांगोली येथील रहिवासी आहे. तो वेल्डिंगचा काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो नातेवाईकांकडे गेला होता. चुकीच्या अंदाजातून झाडलेल्या गोळीने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शिकारीला जातांना सिप्रियान डॉन्टस (वय 45, रा. कोलगाव) हा देखील सचिन सोबत होता. या दोघांबरोबर आणखी काही ओळखीचे मित्रही जंगलात गेले होते. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून पोलीस वेगात तपास करत आहे.
Ans: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील तरंदळे धरणात.
Ans: युवक 22 वर्षांचा आणि युवती 18 वर्षांची असल्याचे माहिती.
Ans: नाही, पोलिस तपास सुरू असून प्रेमसंबंध किंवा कौटुंबिक कारणांची शक्यता व्यक्त केली जाते.






