Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime: सावकारी जाचाचा अजून एक बळी! कर्जत तालुक्यातील घुमरी गावात शेतकऱ्याची आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून कर्जत तालुक्यातील घुमरी गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 22, 2026 | 06:59 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • सावकाराच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
  • कर्जत तालुक्यातील घुमरी येथील घटना
  • दीड लाख रुपये भरूनही सावकाराकडून पुन्हा तितक्याच रकमेची मागणी
खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जावर व्याजापोटी दीड लाख रुपये भरूनही पुन्हा तितक्याच रकमेची मागणी आणि उचलून नेण्याच्या धमक्यांना कंटाळून कर्जत तालुक्यातील घुमरी येथील शेतकरी चंद्रहास गेनबा पांडुळे (वय ५१) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात खासगी सावकार प्रशांत दादासाहेब अनभुले याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी घेतले खासगी कर्ज

मिरजगाव पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रहास पांडुळे (रा. घुमरी, ता. कर्जत) यांनी शेती व दूध व्यवसायासाठी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. वाढता आर्थिक बोजा कमी करण्याच्या उद्देशाने त्यांनी सुमारे १८ महिन्यांपूर्वी गावातील खासगी सावकार प्रशांत अनभुले याच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते.

Dharashiv Crime : जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा पितळ उघड ; अधिकाऱ्यांच्या दारातच निकृष्ट रस्ते, लाखोंचा अपहार आला समोर

व्याज भरूनही तगादा सुरूच

दोन महिन्यांपूर्वी चंद्रहास पांडुळे यांनी व्याजापोटी १ लाख ४५ हजार रुपये रोख स्वरूपात सावकाराला दिले होते. मात्र, तरीही प्रशांत अनभुले याच्याकडून सतत पैशांचा तगादा लावला जात होता. दरम्यान, चंद्रहास यांनी काही बँकांचे कर्ज फेडले असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.

उचलून नेण्याची धमकी; कुटुंबात भीती

८ जानेवारी रोजी खासगी सावकाराच्या धमक्यांमुळे भयभीत झालेल्या चंद्रहास पांडुळे यांनी घरातील कोणालाही काही न सांगता घर सोडले. त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ८ वाजता प्रशांत अनभुले, अनिल पंढरीनाथ अनभुले आणि पप्पू तनपुरे हे चौघे चारचाकी वाहनातून पांडुळे यांच्या घरी आले. यावेळी प्रशांत अनभुले याने घराबाहेर बोलावून फिर्यादीला सांगितले की, चंद्रहासकडून अजूनही १.५ लाख रुपये व्याज बाकी असून, पैसे न दिल्यास त्याला उचलून नेण्यात येईल. तसेच चंद्रहासच्या मागावर माणसे लावल्याची धमकीही दिली.

मांदळी शिवारात मृतदेह आढळला

चंद्रहास यांचा मोबाईल फोन बंद असल्याने नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र ते कुठेही सापडले नाहीत. अखेर आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ऋषी थोरवे (रा. घोगरगाव) यांनी माहिती दिली की, मांदळी गावच्या शिवारात वनविभागाच्या हद्दीतील गौरी शंकर महादेव मंदिराजवळ एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

Mumbai Crime: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या धमकीने माजी महापालिका अधिकाऱ्याला १६ लाखांचा गंडा; ATS–NIA नावाखाली सायबर फसवणूक

सावकाराच्या छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप

मिरजगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केल्यानंतर मृत व्यक्ती चंद्रहास पांडुळे असल्याचे निष्पन्न झाले. खासगी सावकार प्रशांत अनभुले याने केलेल्या सततच्या मानसिक छळामुळे व धमक्यांमुळे चंद्रहास यांनी आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास कर्जत विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय झंजाड व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Web Title: Ahilyanagar news farmer suicide in ghumri village of karjat taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Farmer Suicide

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: शंकरराव गडाखांची स्वतंत्र खेळी सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची, नेवासेत राजकीय उलथापालथ अटळ?
1

Ahilyanagar News: शंकरराव गडाखांची स्वतंत्र खेळी सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची, नेवासेत राजकीय उलथापालथ अटळ?

Ahilyanagar News: नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी! सुजय विखे पाटलांकडून आढावा
2

Ahilyanagar News: नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी! सुजय विखे पाटलांकडून आढावा

Ahilyanagar News: वारी-हिंगोणी रस्त्याची दुरावस्था! उपोषणावर शेकडो तरुण ठाम, रस्ता डांबरीकरणासाठी तहसीलदारांना निवेदन
3

Ahilyanagar News: वारी-हिंगोणी रस्त्याची दुरावस्था! उपोषणावर शेकडो तरुण ठाम, रस्ता डांबरीकरणासाठी तहसीलदारांना निवेदन

Ahilyanagar News: चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट घरावर आदळला, मोठी जीवितहानी टळली
4

Ahilyanagar News: चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट घरावर आदळला, मोठी जीवितहानी टळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.