Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil : ‘शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, तुमच्या पाया पडतो!’ मनोज जरांगे पाटील भावुक, फायनान्स कंपन्यांना दिला इशारा

Manoj Jarange Patil : नांदेडमध्ये फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याच्या घटनेने मनोज जरांगे पाटील भावुक झाले आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असं हात जोडून आवाहन करत त्यांनी कुटुंबाची भेट घेण्याचं जाहीर केलं.

  • By विवेक
Updated On: Nov 02, 2026 | 08:49 PM
Manoj Jarange

Manoj Jarange

Follow Us
Follow Us:
  • शेतकरी आत्महत्यांवर जरांगे पाटील आक्रमक
  • नांदेडमधील शेतकरी कुटुंबाची भेट घेणार
  • शिंदे आणि फडणवीसांच्या लोकांवर जरांगेंचा निशाणा
 

Manoj Jarange Patil : नांदेडमध्ये खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित शेतकरी कुटुंबाची आपण भेट घेणार असून हा विषय सरकार दरबारी लावून धरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचं भावनिक आवाहनही त्यांनी केलं.

शेतकऱ्यांच्या अडचणींवर बोलताना जरांगे पाटील भावुक झाले. संकटं आपल्या पाठीशी लागली आहेत, मात्र दुष्काळाचं संकटही निघून जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये, असं ते म्हणाले.

‘आत्महत्या करू नका, तुमच्या पाया पडतो. लेकराबाळांचं लय हाल होतात,’ अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केली.

‘भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’, Harshvardhan Sapkal यांचा फडणवीसांवर घणाघात! PM मोदी, अमित शाहांनासुद्धा घेरलं

फायनान्स कंपन्यांना पैसे देऊ नका, जरांगेंचं आवाहन

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने फायनान्स कंपनीचं कार्यालय फोडल्याच्या घटनेवरही जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी ताकदीने उभं राहणार असल्याचं सांगत त्यांनी फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या पद्धतीवर आक्षेप घेतला.

फायनान्सवाल्यांना पैसे द्यायचे नाहीत, महाराष्ट्रात कोणीही पैसे भरायचे नाहीत, असं आवाहनही त्यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे कर्जवसुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकार माझ्याविरोधात टीम तयार करतंय; जरांगेंचा आरोप

यावेळी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवरही गंभीर आरोप केले. मराठा समाजातील काही लोकांना आपल्याविरोधात बोलण्यासाठी पुढे केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांकडून आपल्याविरोधात वातावरण तयार केलं जात असल्याचंही ते म्हणाले. मात्र, आपण अशा टीकेला उत्तर देत बसणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

२०२९ च्या निवडणुकीबाबत मोठं विधान

आगामी राजकारणाबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी २०२९ च्या निवडणुकीचा उल्लेख केला. योग्य वेळी मतदानाबाबत भूमिका जाहीर करू, असं सांगत सत्तेत मराठा समाजाचे चार ते पाच मंत्री असायलाच हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

इतर समाजांना अडचणीच्या वेळी त्यांच्या समाजातील मंत्र्यांचा आधार मिळतो. मात्र मराठा समाजाला तसा आधार मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका आणि दुसरीकडे २०२९ च्या राजकारणाचे संकेत, यामुळे जरांगे पाटील यांच्या विधानांची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

BMC भाजपच्या दावणीला बांधली आहे का? Dia Mirza यांच्या व्हिडीओवरून Kishori Pednekar यांचा घणाघाती सवाल

💡

Frequently Asked Questions

  • Que: मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांना काय आवाहन केलं?

    Ans: शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये. दुष्काळ आणि आर्थिक संकट दूर होऊ शकतं, त्यामुळे कुटुंबाचा विचार करून टोकाचं पाऊल उचलू नका, असं भावनिक आवाहन त्यांनी केलं.

  • Que: नांदेडमधील शेतकरी आत्महत्येच्या घटनेवर जरांगे पाटील काय म्हणाले?

    Ans: संबंधित शेतकरी कुटुंबाची भेट घेणार असून हा विषय सरकार दरबारी लावून धरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

  • Que: २०२९ च्या निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

    Ans: २०२९ मध्ये योग्य वेळी मतदानाबाबत भूमिका जाहीर करू, असं त्यांनी सांगितलं. तसेच सत्तेत मराठा समाजाचे चार ते पाच मंत्री असायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Manoj jarange patil farmers suicide finance company protest vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • Farmer Issue
  • Farmer Suicide
  • Manoj Jarange Patil

संबंधित बातम्या

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना त्रास दिला तर आडवं करू!’ मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
1

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना त्रास दिला तर आडवं करू!’ मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा

Buldhana News : पावसाने वाळणारी पिकं आता वाचणार? तूर, कपाशी आणि हळदीला सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय!
2

Buldhana News : पावसाने वाळणारी पिकं आता वाचणार? तूर, कपाशी आणि हळदीला सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय!

Farmers Water Crisis : वैजापुरात पाण्यासाठी शेतकरी आक्रमक! नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
3

Farmers Water Crisis : वैजापुरात पाण्यासाठी शेतकरी आक्रमक! नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

Manoj Jarange Patil: टोरंट प्रकल्पावरून सरकारला इशारा; ‘सह्याद्री उद्ध्वस्त करण्याचा घाट थांबवा’, मनोज जरांगे पाटील यांची मागणी
4

Manoj Jarange Patil: टोरंट प्रकल्पावरून सरकारला इशारा; ‘सह्याद्री उद्ध्वस्त करण्याचा घाट थांबवा’, मनोज जरांगे पाटील यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.