जिल्ह्यातील काही मोजक्या तालुक्याचा अपवाद वगळता शेती निसर्ग पावसाच्या लहरीपणावर मोठ्या प्रमाणात विसंबून आहे. पावसाचा खंड पडला की पीकांचे पोषण व वाढ होत नाही.
बाबासाहेब भानुदास जंगले असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, पाच दिवसांत पैठण तालुक्यात तीन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाने आत्महत्या केल्याच्या घटनांनी सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अल्पभूधारक शेतकरी असलेल्या मधुकर यांच्या शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्यांनी गावातील अनेक मंडळीशी त्या अनुषंगाने संवाद साधला होता. त्यांचा लहान मुलगा हैद्राबाद येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.
आठ महिन्यात संभाजीनगर विभागात ५२० आत्महत्याची नोंद आहे. पश्चिम विदर्भात ७०७ शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. राज्यात १४ आत्महत्याप्रवण जिल्हे आहेत. यात विदर्भातील ६ आणि मराठवाड्यातील ८ जिल्हे आहेत.