Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Traffic Jam: सायरन वाजत राहिला, आई-वडील आक्रोश करत राहिले, पण रस्ता मिळालाच नाही; अलिबागमध्ये चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Raigad Traffic Jam: रायगडच्या अलिबाग तालुक्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. खेळता-खेळता घशात फुगा अडकलेल्या पावणे दोन वर्षांच्या चिमुरड्याला रुग्णालयात नेताना रुग्णवाहिका रस्त्याच्या कामामुळे दीड तास वाहतूककोंडीत अडकली. वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळाचा आईच्या कुशीतच मृत्यू झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 18, 2026 | 10:11 AM
Raigad Traffic Jam: सायरन वाजत राहिला, आई-वडील आक्रोश करत राहिले, पण रस्ता मिळालाच नाही; अलिबागमध्ये चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Raigad Traffic Jam: सायरन वाजत राहिला, आई-वडील आक्रोश करत राहिले, पण रस्ता मिळालाच नाही; अलिबागमध्ये चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • घशात फुगा अडकल्याने प्रकृती गंभीर
  • दीड तास वाहतूककोंडीत अडकल्याने मृत्यू
  • ठेकेदार आणि प्रशासनाविरोधात संताप
Raigad Traffic Jam: रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. बेलकडे-अलिबाग मार्गावरील रस्त्याच्या कामामुळे लागलेल्या भीषण वाहतूककोंडीत एक रुग्णवाहिका तब्बल दीड तास अडकून पडली. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे फुगा घशात अडकलेल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकल्या बाळाचा आईच्या कुशीतच करुण अंत झाला आहे. आरांश सुशील ठाकूर (वय १ वर्ष ८ महिने, रा. बामणगाव) असे या दुर्दैवी मृत बालकाचे नाव आहे.

हेही वाचा: मोठी बातमी ! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह चार आमदारांना मारण्याची धमकी; ‘तो’ फोन आला अन्…

नेमकी घटना काय?

बामणगाव येथील नाक्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सुशील ठाकूर यांचा आरांश हा धाकटा मुलगा होता. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आरांश नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या अंगणात खेळत होता. खेळता-खेळता त्याने अचानक एक फुगा गिळला, जो त्याच्या घशात जाऊन अडकला. काही क्षणांतच आरांशचा श्वास गुदमरू लागला आणि त्याला श्वास घेण्यास तीव्र त्रास होऊ लागला. मुलाची ही जीवघेणी अवस्था पाहून घाबरलेल्या पालकांनी तातडीने अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली.

रस्त्याच्या कामामुळे दीड तासांची जीवघेणी प्रतीक्षा

रुग्णवाहिकेतून आरांशला रुग्णालयात नेले जात असताना, बेलकडे-अलिबाग मार्गावर सुरू असलेल्या रस्ताच्या कामामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘माझ्या लेकराचा श्वास कोंडतोय, कोणीतरी रस्ता द्या हो…’ असा हदय पिळवटून टाकणारा आक्रोश आरांशचे आई-वडील रुग्णवाहिकेतून करत होते. रुग्णवाहिकेचा सायरन सतत वाजत असूनही वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी तिथे कोणीही उपलब्ध नव्हते. तब्बल दीड तासानंतर रुग्णवाहिकेला पुढे जायला रस्ता मिळाला; परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दुपारी चार वाजता रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून आरांशला मृत घोषित केले.

हेही वाचा: मार्केटयार्ड परिसरात रिक्षेतून एमडी विक्रीचा डाव उधळला; तिघे ताब्यात; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिकांमध्ये संताप; प्रशासनावर आणि ठेकेदारावर कारवाईची मागणी

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कालपर्यंत ज्या घरात चिमुकल्याच्या बोबड्या बोलांनी आणि खेळण्यांनी आनंद भरला होता, तिथे आता केवळ आई-वडिलांचा हंबरडा ऐकू येत आहे. या घटनेची सखोल वैद्यकीय आणि प्रशासकीय चौकशी करावी, तसेच संबंधित रस्ता ठेकेदार आणि दोषी प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी संतप्त मागणी स्थानिकांकडून आणि नागरिकांकडून केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अलिबागमध्ये नेमकी कोणती दुर्दैवी घटना घडली आहे?

    Ans: अलिबाग तालुक्यातील बामणगाव येथील आरांश सुशील ठाकूर (वय १ वर्ष ८ महिने) या चिमुकल्याने खेळता-खेळता फुगा गिळल्याने तो घशात अडकला. त्याला रुग्णालयात नेताना रुग्णवाहिका वाहतूककोंडीत दीड तास अडकल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

  • Que: रुग्णवाहिका वाहतूककोंडीत का अडकली होती?

    Ans: बेलकडे-अलिबाग मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मार्ग काढण्यासाठी जागा नसल्याने रुग्णवाहिका तब्बल दीड तास अडकून पडली.

  • Que: या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी काय मागणी केली आहे?

    Ans: या घटनेची सखोल वैद्यकीय व प्रशासकीय चौकशी करून संबंधित रस्ता ठेकेदार आणि दोषी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Web Title: Alibag traffic jam ambulance stuck toddler dies choking balloon raigad news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • Baby Death
  • Raigad News
  • Traffic

संबंधित बातम्या

Raigad News: राष्ट्रवादीत माझा वापरा आणि फेका! दर्शन विचारे यांचा आरोप
1

Raigad News: राष्ट्रवादीत माझा वापरा आणि फेका! दर्शन विचारे यांचा आरोप

Mahayuti Politics: महायुतीतील भांडणाला गंभीर वळण ! तटकरे-दळवी संघर्षाने वाढवली फडणवीसांची डोकेदुखी
2

Mahayuti Politics: महायुतीतील भांडणाला गंभीर वळण ! तटकरे-दळवी संघर्षाने वाढवली फडणवीसांची डोकेदुखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.