संग्रहित फोटो
सुभाषगौडा गुरन्ना चौधरी (वय ३२), बाप्पू भिमा बाळशंकर (वय २८) आणि शाहरुख मेहबुब खान (वय २८, तिघेही रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थविरोधी कारवाईच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पथक मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर काळ्या-पिवळ्या रंगाच्या रिक्षामध्ये तिघेजण संशयास्पदरीत्या बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने रिक्षाजवळ जाऊन तिघांना ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे २४.६३ ग्रॅम मॅफेड्रोन आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत ४ लाख ९२ हजार ६०० रुपये आहे. याशिवाय ६० हजार रुपये किमतीचा मोबाईल, दीड लाख रुपये किमतीची रिक्षा आणि २ हजार ८२९ रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे हा अमली पदार्थ कुठून आला, तो कोणाला विक्री केला जाणार होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक जीवन माने, सहायक निरीक्षक अफरोज पठाण तसेच अंमलदार अमोल जगताप, सतीश चव्हाण, शरद धांडे आणि संदीप देवकाते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हे सुद्धा वाचा : टोमणे, शिवीगाळ अन् मारहाण; सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
Ans: मार्केटयार्ड परिसरात रिक्षामधून मॅफेड्रोन (एमडी) विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले.
Ans: आरोपींकडून २४.६३ ग्रॅम मॅफेड्रोनसह मोबाईल, रिक्षा आणि रोकड असा एकूण ७ लाख ५ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Ans: पोलिसांनी आरोपींकडून २४.६३ ग्रॅम मॅफेड्रोन जप्त केले असून, त्याची किंमत ४ लाख ९२ हजार ६०० रुपये आहे.






