Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत असलेल्या व्यक्तीला मुलांना भेटण्यासाठी बोलावून घेतल्यानंतर सासरच्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 18, 2026 | 12:03 PM
मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्...; पुण्यातील घटनेनं खळबळ

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्...; पुण्यातील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत असलेल्या व्यक्तीला मुलांना भेटण्यासाठी बोलावून घेतल्यानंतर सासरच्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना कोथरुड परिसरातील असून, याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी नारायण पांडुरंग जानकर (वय ४८, रा. किष्कींदानगर, कोथरुड) यांनी गुरुवार पेठ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार मयुरी नारायण जानकर, सुरेश लक्ष्मण बावदाने, महेश लक्ष्मण बावदाने, संगीता महेश बावदाने, भगवान बाबू मरगळे आणि लक्ष्मण राया बावदाने (रा. सुतारदरा, कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत आहेत. मुलांची आठवण आल्याने ते आरोपी महेश बावदाने याच्याशी संपर्क साधून मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. नंतर त्यांना भेटण्यासाठी बोलावण्यात आले. तक्रारदार हे ग्रीललाईन मेडिकलसमोर, कर्वे रस्ता परिसरात पोहोचले असता त्यांची पत्नी आणि अन्य आरोपी तेथे आले. वेगळे राहत असल्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत हाताने मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहे.

नंतर आरोपींनी तक्रारदाराला रिक्षातून मुलांना भेटण्यासाठी नेण्याचे सांगितले. मात्र, त्यांना सुतारदरा येथील मोकळ्या मैदानात नेऊन दगड आणि बांबूने मारहाण करण्यात आली. तसेच अन्य आरोपींनीही शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काही काळ तक्रारदाराला घरात कोंडून ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार ८ मे रोजी घडला असून, याप्रकरणी १६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : नागपुरात पुन्हा गोळीबार! महाल परिसरात मध्यरात्री थरार; तीन बाईकवर आले अन् दोनदा गोळीबार केला

झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

मावळ तालुक्यातील निळशी गावात झोपेत असलेल्या व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वडगाव मावळ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हरिभाऊ वसंत कांबळे (वय २४, रा. ढोरेवाडा, वडगाव मावळ) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे चुलते कुलदीप चंद्रकांत कांबळे (वय ३४, सध्या रा. दहिसर, मुंबई) हे गावातील प्रमोद दत्तात्रय म्हसे यांच्या टेरेसवर झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला केला आहे.

Web Title: An incident of beating a person has taken place in kothrud pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.