Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाच स्वीकारली, एसीबीची चाहूल लागताच पळाला; दीड महिन्यांनी फरार हवालदाराला केली अटक

तक्रारदाराकडून ९५ हजार रुपयांची लाच स्विकारताना गजाआड करण्यात आलेला पोलिस हवालदार पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्यानंतर तब्बल दीड महिन्याने अखेर सोमवारी (दि. १६) पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 17, 2026 | 06:23 PM
लाच स्वीकारली, एसीबीची चाहूल लागताच पळाला; दीड महिन्यांनी फरार हवालदाराला केली अटक

लाच स्वीकारली, एसीबीची चाहूल लागताच पळाला; दीड महिन्यांनी फरार हवालदाराला केली अटक

Follow Us
Follow Us:
  • ९५ हजारांची लाच स्वीकारताना कारवाई
  • एसीबीची चाहूल लागताच झाला फरार
  • दीड महिन्यानंतर शिरूरमध्ये अटक
कवठे येमाई : तक्रारदाराकडून ९५ हजार रुपयांची लाच स्विकारताना गजाआड करण्यात आलेला पोलिस हवालदार पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्यानंतर तब्बल दीड महिन्याने अखेर सोमवारी (दि. १६) पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने शिरूर नगरपरिषद परिसरातून ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे. सतीश नाथराव मुंढे असे अटक केलेल्याचे नाव असून, न्यायालयाने त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे शिरूर पोलीस ठाण्याशी संबंधित गाजलेल्या लाचखोरी प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

एक लाखांच्या लाचेची मागणी

शिरूर पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांत अटक न करण्यासाठी तसेच प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात मुंढे याने एक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी टाकळी हाजी पोलीस चौकीत पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी सुरुवातीला एक लाख रुपये आणि तडजोडीनंतर ९५ हजार रुपये देण्याचे निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपतने सापळा रचला. टाकळी हाजी पोलीस चौकीत मुंढे याने तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. मात्र, लाचलुचपतच्या पथकाची चाहूल लागताच त्याने स्वीकारलेली लाच रक्कम आणि तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्याची कागदपत्रे घेऊन तो पसार झाला.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडकरांची प्रतीक्षा संपणार! मार्चपासून भामा-आसखेडचे 167 एमएलडी पाणी मिळणार

मुंडे फरार झाल्यापासून त्याचा शोध सुरू होता. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांनी त्याला शिरूर नगरपरिषद परिसरातून अटक केली. त्यानंतर विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que:  सतीश मुंढेला का अटक केले?

    Ans: शिरूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत तक्रारदाराला अटक न करण्यासाठी आणि प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात त्याने एक लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ९५ हजार रुपये स्वीकारताना तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला.

  • Que: लाच स्वीकारल्यानंतर मुंढेने काय केले?

    Ans: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची चाहूल लागताच मुंढे ९५ हजार रुपये आणि तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्याची कागदपत्रे घेऊन पसार झाला. तब्बल दीड महिन्याने त्याला शिरूर नगरपरिषद परिसरातून अटक करण्यात आली.

  • Que: सतीश मुंढेला न्यायालयाने काय शिक्षा सुनावली?

    Ans: अटकेनंतर मुंढेला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: The acb has taken action against a police constable for accepting a bribe nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • ACB
  • Bribe News
  • crime news

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलीची दादर रेल्वे स्थानकावरून सुरक्षित सुटका; सोशल मीडियामुळे छत्तीसगडवरून आली अन्…
1

अल्पवयीन मुलीची दादर रेल्वे स्थानकावरून सुरक्षित सुटका; सोशल मीडियामुळे छत्तीसगडवरून आली अन्…

दुबईतून भारतात ऑनलाइन फसवणुकीचा मोठा कट; 10 ते 12 हजार सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
2

दुबईतून भारतात ऑनलाइन फसवणुकीचा मोठा कट; 10 ते 12 हजार सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Indradev Maharaj Sexual Assault Case: २०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण; महामंडलेश्वर इंद्रदेव महाराजांवर गंभीर आरोप
3

Indradev Maharaj Sexual Assault Case: २०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण; महामंडलेश्वर इंद्रदेव महाराजांवर गंभीर आरोप

Pune Crime : ‘एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून’ दोन गटांत तुफान राडा; विटा-लाथाबुक्क्यांसह जोरदार दगडफेकीत दुचाकींचे नुकसान!
4

Pune Crime : ‘एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून’ दोन गटांत तुफान राडा; विटा-लाथाबुक्क्यांसह जोरदार दगडफेकीत दुचाकींचे नुकसान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.