Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhya Pradesh Crime: चरित्र्यावर संशय; संतापलेल्या पतीने पत्नीचं नाक ब्लेडने कापलं, बोटांवरही वार केले

मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर निर्दय हल्ला करत तिचं नाक ब्लेडने कापलं. बोटांवरही वार करून तिला गंभीर जखमी केलं. आरोपीला पोलिसांनी अटक करून तपास सुरु केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 05, 2025 | 02:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला
  • पतीने ब्लेडने पत्नीचं नाक कापलं
  • आरोपीला अटक; तपास सुरु
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथील झाबुआ जिल्ह्यातील राणापूर तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीला निर्दयपणे मारहाण करत तिची नाक ब्लेडने कापल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास पाडलवा गावात घडली. राकेश (वय २३) आणि त्याची पत्नी (वय २२) हे गुजरातमधील संतरामपूर येथील एका कारखान्यात गेल्या चार महिन्यांपासून मजुरीचे काम करत होते. त्यांच्या सोबत त्यांचा सहा वर्षांचा मुलगाही होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्या कारखान्यात बिहारमधील एका मजुराशी पत्नीचं बोलणं होत होतं. याच कारणावरून राकेश पत्नीवर संशय घेत होता आणि तिच्याशी वारंवार वाद घालत होता. मंगळवारी दोघे पती-पत्नी मोटारसायकलने संतरामपूरवरून आपल्या गावाकडे येत होते. प्रवासादरम्यान दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

Pune Crime: संसार थाटला, अनेकांच्या घरी काम केलं… पण व्हिसाची मुदत संपली; दहशतवाद विरोधी पथकाने घेतलं ताब्यात

नाक कापले…

संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ते गावात पोहोचले आणि वाद वाढला. संतापाच्या भरात राकेशने आपल्या पर्समधून ब्लेड काढले आणि पत्नीच्या नाकावर वार केला. यात पत्नीचं नाक कापलं गेलं आणि काही भाग तुटून खाली पडला. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने ब्लेडने पत्नीच्या बोटांवरही वार केले.यात ती गंभीर जखमी झाली. नाक कापल्यानंतर नाकाचा तुकडा जमिनीवर पडला, मात्र शोदल्यानंतर तो सापडला नाही. या घटनेने परिसरात गोंधळ उडाला.

कुत्र्यांनी नेला नाकाचा तुकडा उचलून

घनस्थळी उपस्तिथ असलेल्या स्थानिकांच्या माहितीनुसार, कुत्र्यांनी तो नाकाचा तुकडा उचलून नेला असावा. त्यानंतर राकेशने स्वतःच पत्नीला मोटारसायकलवर बसवून राणापूर येथील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आणि झाबुआ जिल्हा रुग्णालयात हलवले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु आहे असं राणापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी दिनेश रावत यांनी सांगितले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Haryana crime: पतीच्या बेरोजगारीचा सूड! पत्नीकडून वीट-दांडक्याने निर्घृण खून; मृतदेहाशेजारी बसून केला मेकअप

Web Title: Angry husband cuts off wifes nose with blade also stabs her fingers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.