भोसरीत अवैध वास्तव्यात बांगलादेशी महिला
व्हिसाची मुदत संपूनही राहत होती भारतात
दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई सुरू
पुणे: पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथून अवैध वास्तव्यात असणाऱ्या बांगलादेशी महिलेला दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती भोसरी परिसरात राहत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्या महिलेचं नाव माला विट्ठल डावखर उर्फ फातिमा अमजद अख्तर (वय ३५) असे आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून ती भारतात राहत होती. काही वर्षांपासून ती भोसरी परिसरातील चक्रपाणी वसाहत भागात ती रहात होती. ती भारतात कामाच्या शोधात आली होती. अनेकांच्या घरी ती घरकाम करत होती.
संसार थाटला
फातिमा हिने इथे राहून विवाह देखील केला. तिचा विवाह कर्नाटक राज्यातील एका तरुणाशी झाला असून दोघेही भोसरीमधील चक्रपाणी वसाहत परिसरात राहत होते. तिच्या पतीला ती बांगलादेशी असल्याची कल्पना होती.
मायदेशी परत पाठवण्याची कारवाई
दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई फातिमाचा व्हिसाची मुदत संपल्याने केली आहे. फातिमा ही भारतात तिचा व्हिसाची मुदत संपूनही अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले. तिला मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पोलीस आता फातिमा अमजद अख्तर हिला तिच्या मूळ मायदेशी (बांगलादेश) परत पाठवण्याची प्रक्रिया करत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने ही कारवाई केली असून, तिला मायदेशी परत पाठवण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.
पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध? बाजीराव रस्त्यावर भरदिवसा अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून
पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय. काही दिवसांपूर्वी गणेश काळे नावाच्या रिक्षाचालकाची भरदिवसा हत्या झाली होती. या खुनाचा उलगडा पोलीस करतच होते तर भरदिवसा पुन्हा एक हत्या झाली आहे. आता वाहतुकीने कायम गजबजलेल्या आणि वर्दळ असलेल्या बाजीराव रस्त्यावर अल्पाईन मुलाचा भरदिवसा डोक्यात आणि तोंडावर वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून तिघेही अल्पवयीन आहेत. गेल्या तीन दिवसात भरदिवसा झालेली ही दुसरी हत्या आहे.
KALYAN CRIME: पादचारी पुलावरून ८ महिन्यांच्या बाळाची चोरी; सीसीटीव्हीत कैद संपूर्ण प्रकार






