crime (फोटो सौजन्य: social media )
अकोला : अकोल्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. शेजाऱ्याने एका मूकबधिर मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे. ही घटना अकोला शहरातील मोठी उमरी येथील परिसरातील १० सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने शहर हादरून गेले आहे.
परभणीत भीषण अपघात, भरधाव ट्रक थेट झाडावर आदळला, अपघातात चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू
नेमकं काय घडलं?
अकोला शहरातील मोठी उमरी येथील परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत राहणार नितीन रामकृष्ण खंडारे (वय 38) याने शेजारी राहणाऱ्या एका मूकबधिर मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे.
घटनेच्या रात्री आरोपी खंडारे हा मुलीच्या घरात शिरला. त्यावेळी मुलगी आणि तिची आई गाढ झोपेत होत्या. आरोपीने पीडित मुलीच्या तोंडावर रुमाल दाबला, घराचा दरवाजा व खिडक्या बंद करून घेतल्या आणि तिचा गळा आवळला. त्यामुळे मुलीचा श्वास गुदमरून लागला. भीतीने घाबरलेल्या मुलीने धैर्य दाखवत तोंडावरील रुमाल दूर फेकला आणि दरवाजा उघडून घराबाहेर पळ काढला. आरोपी देखील त्याचवेळी पसार झाला.
यांनतर पीडित मूकबधिर मुलीने खाणाखुणांच्या माध्यमातून नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार आधारे सिव्हिल लाईन पोलिसांनी आरोपी नितीन खंडारे विरुद्ध 74, 75 (1), 333 या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करीत आहेत. सलग दोन गंभीर घटना घडल्याने अकोल्यात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.
सासरवाडीतच जावयाचा धारदार शस्त्राने खून; कौटुंबिक वादातून हत्या
अकोला जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जावयाचा धारदार शास्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हत्या त्यांच्या सासरवाडीत झाल्याने गावात तणावपूर्ण वातावरण आहे. ही हत्या कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावात बुधवारी संध्याकाळी 6:00 वाजता घडली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव पायरुजी गोपनारायण (वय 40, रा. कानशिवनी, ता. अकोला) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेश गोपनारायण हे त्यांच्या सासरवाडीत अंबाशी येथे गेले होते. यावेळी त्यांच्यात आणि सासरच्या मंडळींमध्ये कौटुंबिक कारणांवरून वाद सुरु झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याचवेळी काही नातेवाईकांनी नागेश यांच्यावर धारदार शास्त्र, चाकू आणि लाकडी काठ्यांनी हल्ला केला. या गंभीर हल्ल्यात नागेश यांचा जागीच मृत्यू झाला.
पैशांचा किरकोळ वाद बेतला जीवावर; तरुणाने चाकूने सपासप वार करत केली हत्या