crime (फोटो सौजन्य: social media )
परभणी: परभणी जिल्ह्यातील जिंतूर औंढा महामार्गावरील पुंगळा गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरून वेगाने जात असलेल्या ट्रकने थेट झाडाला धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. यात चालक आणि क्लीनर दोघांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
OBC नेते लक्ष्मण हाकेंच्या अडचणी वाढल्या; मराठा समाजाबाबतच्या ‘त्या’ व्यक्तव्याविरुद्ध गुन्हा दाखल
जिंतूर औंढा महामार्गावरील पुंगळा गावाजवळून जाणाऱ्या एपी 16 टीजे 6318 क्रमांकाचा भरधाव ट्रकने झाडाला धडक दिली. ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वेगवान ट्रक थेट झाडाला धडकली. ही धडक इतक्या जोराची होती की, ट्रकच्या समोरचा भाग अक्षरशः चेमटून गेला असून ट्रकचा क्लिनर जागीच ठार झाला आहे. तर चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले परंतु चालकाचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
दुर्घटनेनंतर क्रेनच्या साहाय्याने झाडात अडकलेल्या जखमी ट्रक ड्रायव्हरला बाहेर काढण्यासाठी तब्बल चार तास शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याच्याही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम सुरु होते. वाहतूक पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
परभणीत बालिकेवर अत्याचार प्रकरणी बंजारा समाजात उद्रेक
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांडा येथे 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठच्या दरम्यान दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या तेरा वर्षीय मुलीला उचलून नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर संबंधित आरोपीवर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देखील करण्यात आला. लैंगिक अत्याचार करणाऱ्या पीडित कुटुंबाला आरोपीच्या कुटुंबीयांकडून धमकावण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यामुळे चिडलेल्या बंजारा बांधवांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गाठले. मोठ्या संख्येने आलेल्या बंजारा बांधवांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन सदरील आरोपीवर कठोर कारवाई करावी तसेच आरोपीचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना गावातून हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Indore मध्ये मृत्यूचे भीषण तांडव! एक ट्रक वेगाने आला अन् असंख्य लोकांना…; पहा Viral Video