Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; अंगावर मारहाणीचे तब्बल 29 व्रण, 5-6 जखमा तर…

वैष्णवीला तिच्या सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता. तिला वेळोवेळी मारहाण करण्यात येत होती. कौटुंबिक कलह, हुंड्याची मागणी आणि आर्थिक कारणांमुळे हा छळ दिवसेंदिवस वाढत गेला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 27, 2025 | 10:54 AM
वैष्णवीच्या अंगावर तब्बल 29 मारहाणीचे व्रण

वैष्णवीच्या अंगावर तब्बल 29 मारहाणीचे व्रण

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची केवळ पुण्यातच नाहीतर संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरु आहे. या आत्महत्येनंतर राजकीय स्तरावरही तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यातच सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयाकडून त्यांना 28 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी दिलेली पोलीस कोठडी संपल्यानंतर सोमवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर ही शिक्षा सुनावली.

वैष्णवी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, वैष्णवीच्या अंगावर तब्बल 29 मारहाणीचे व्रण आढळले असून, त्यातील ५ ते ६ जखमा आत्महत्येच्या अगदी काही तासांपूर्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे अत्यंत गंभीर असून, तिच्यावर सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी कडक कारवाई करत हगवणे कुटुंबियांची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वैष्णवीच्या नावावरचं सोनं तारण ठेवून त्यातून मिळालेल्या रकमेचा वापर कुठे झाला, हे अद्याप स्पष्ट नाही.

दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबीयांमधील संबंधांचा तपास करणे गरजेचे आहे. तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली होती.

सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल?

पोलिसांच्या तपासात, वैष्णवीला तिच्या सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता. तिला वेळोवेळी मारहाण करण्यात येत होती. कौटुंबिक कलह, हुंड्याची मागणी आणि आर्थिक कारणांमुळे हा छळ दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर सहनशक्तीचा अंत होऊन वैष्णवीने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी मांडला आहे.

मुळशीत वैष्णवीचे आत्महत्याप्रकरण

मुळशी तालुक्यातील आपल्या सासरच्या घरी वैष्णवी हगवणे हिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वैष्णवीच्या वडिलांनी, अनिल कस्पटे यांनी मुळशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत सासरच्या पाच सदस्यांवर – शशांक (पती), लता (सासू), करिश्मा (नणंद), राजेंद्र (सासरे) आणि सुशील (दीर) – मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

Web Title: As many as 29 wounds from beatings on the vaishnavi hagawane body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • Pune Crime
  • Suicide case
  • Vaishnavi hagawane

संबंधित बातम्या

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…
1

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…

Pune Crime History Part 1 Exclusive: पुण्यातील पहिल्या गुन्हेगार टोळीचा उदय; आंदेकर व माळवदकर संघर्षाचा रक्तरंजित इतिहास
2

Pune Crime History Part 1 Exclusive: पुण्यातील पहिल्या गुन्हेगार टोळीचा उदय; आंदेकर व माळवदकर संघर्षाचा रक्तरंजित इतिहास

पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
3

पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Fraud News : सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 33 लाखांना घातला गंडा
4

Fraud News : सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 33 लाखांना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.