
आसाम सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूवर गावकऱ्यांचा निर्णय
आसाममधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीने शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांच्या ताब्यातून पलायन करून नागाव जिल्ह्यातील धिंग येथील तलावात उडी मारली. या अपघातात मुख्य आरोपीचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली आणि ‘गुन्ह्याचे ठिकाण’ तपासण्यासाठी पहाटे 3.30 वाजता त्याला गुन्ह्याच्या ठिकाणी नेण्यात आले. मात्र आरोपी तफाजुल इस्लामने पोलिसांच्या ताब्यातून पळ काढला आणि तलावात उडी मारली. तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली आणि सुमारे दोन तासांनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.”
दरम्यान, आरोपीचे वडिलोपार्जित घर असलेल्या बोरभेटी येथील गुन्हेगाराच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्याच्या कुटुंबालाही समाजापासून वेगळे केले आहे. आम्ही गुन्हेगारांसोबत राहू शकत नाही.’ तसेच त्याच्या मृतदेहासाठी स्मशानात जागा मिळणार नाही, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
नागावचे पोलीस अधीक्षक (एसपी) स्वप्नील डेका यांनी सांगितले की, शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या आरोपीला हातकडी घालून पहाटे 3.30 च्या सुमारास गुन्हा घडला त्या ठिकाणी नेण्यात आले जेणेकरून ‘गुन्ह्याचे ठिकाण’ शोधता येईल. डेका म्हणाले, ‘पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करून आरोपींनी पोलिसांच्या ताब्यातून पळ काढला आणि तलावात उडी मारली.’
एसडीआरएफला तात्काळ माहिती देण्यात आली, शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि सुमारे दोन तासांनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यादरम्यान एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिकवणी घेऊन सायकलवरून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी हल्ला करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
या सामूहिक अत्याचारात तिला जखमी आणि बेशुद्धावस्थेत एका तलावाजवळ रस्त्याच्या कडेला सोडले, असे पोलिसांनी सांगितले. दहावीच्या विद्यार्थ्याला नंतर स्थानिक लोकांनी पाहिले आणि पोलिसांना कळवले. दरम्यान, शनिवारी सकाळी बोरभेटी ग्रामस्थांनी बैठक घेऊन तरुणाने केलेल्या गुन्ह्याबाबत तीन निर्णय घेतले.
गावातील मोहम्मद शाहजहान अली चौधरी म्हणाले, ‘आम्ही त्याला गावातील कब्रस्तानमध्ये दफन करू न देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच्या ‘जनाजे’ला उपस्थित न राहण्याचा आणि त्याच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ‘गावातील तरुणाच्या या गुन्ह्यामुळे आम्हाला लाज वाटली असून आम्ही त्याला सामुदायिक स्मशानभूमीत दफन करू देऊ शकत नाही.’
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गावातील मशिदीतून मोर्चाही काढण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांनी शुक्रवारी सांगितले की, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. बराक खोऱ्यातील तीन जिल्ह्यांचा दौरा करणारे शर्मा म्हणाले की, अशा प्रकरणांना सामोरे जाण्याच्या आसाम आणि बंगालच्या पद्धतींमध्ये फरक आहे.
ते म्हणाले, “जेव्हा बंगालमध्ये महिलांवर अत्याचार होतात, तेव्हा गुन्हेगारांना संरक्षण मिळते आणि पोलिसांची कारवाई संशयास्पद राहते. आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर जघन्य गुन्हा घडला, आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. शर्मा म्हणाले की, त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना घटनास्थळी भेट देऊन घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसऱ्याला ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.