Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badlapur Murder Case: ड्रायव्हर काकाने आईला मारलं… चिमुकल्याच्या एका वाक्याने उलगडलं दुहेरी मृत्यूचं रहस्य

बदलापूरमध्ये फोन व्यस्त येत असल्याच्या संशयातून ओला चालक ज्योतिबा शिंदे याने महिला मनीषा भोसले यांच्यावर तब्बल 48 वार करून हत्या केली. हा थरार तिच्या 3 वर्षांच्या मुलासमोर घडला. हत्येनंतर आरोपीने स्वतःवरही वार करून आत्महत्या केली. पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 13, 2026 | 08:19 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • फोनवरील संशयातून महिला आणि ओला चालकामध्ये सतत वाद होत होते.
  • संतापलेल्या चालकाने महिलेवर 48 वार करून हत्या केली.
  • हत्येनंतर आरोपीने स्वतःवर 8 वार करून आत्महत्या केली.
बदलापूर: फोन व्यस्त येत असल्याच्या संशयातून सुरू झालेला वाद अखेर दुहेरी मृत्यूत संपला आणि बदलापूर हादरून गेला. एका ओला चालकाने महिलेवर तब्बल 48 वार करत निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही वार करून आत्महत्या केली. या संपूर्ण थरारक घटनेचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे हा रक्तरंजित प्रकार महिलेच्या अवघ्या 3 वर्षांच्या मुलासमोर घडला.

Tasgaon Gutkha Seizure: प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर पोलिसांचा घाव; ११.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

काय घडलं नेमकं?

या घटनेतील मृत महिलेचा नाव मनीषा भोसले आहे. त्यांचे पती घाटकोपर परिसरात चहा विक्रीचा व्यवसाय करतात. सुमारे चार महिन्यांपूर्वी मनीषा भोसले यांनी बदलापूरहून घाटकोपरला जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. या प्रवासादरम्यान त्यांची ओळख ओला चालक ज्योतिबा शिंदे याच्याशी झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. मात्र हीच मैत्री पुढे एक भीषण हत्याकांडात झाली. गेल्या दहा दिवसांपासून या मनीषा आणि ज्योतिबा यांच्या दोघात वेगवेगळ्या कारणावरून सातत्याने वाद होत होते. ज्योतिबा हा मनीषाला सतत फोन करण्याचा प्रयत्न करत होता. मनीषा यांचा फोन वारंवार व्यस्त येत असल्याने ज्योतिबाच्या मनात संशय आला. माझ्याशिवाय तू इतर कोणाशी फोनवर बोलतेस, असा फोनवर जाब विचारला आणि वाद घालण्यास सुरुवात केली.

तब्बल ४८ वार

ज्योतिबा हा थेट घाटकोपरहून थेट बदलापूरला पोहोचला. बदलापूर पूर्वेतील जीवेलीगाव परिसरात मनीषा भोसले यांच्याशी त्याचा पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि त्याने थे मनीषावर धारधार शास्त्राने तब्बल ४८ वार केले. या भीषण हल्ल्यात मनीषा भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण थरार मनीषाच्या ३ वर्षांच्या मुलासमोर घडला.

स्वतःवरही ८ वार

यांनतर ज्योतिबाने त्याच धारधार शास्त्राने स्वतःवरही ८ वार केले. स्वतःवर केलेल्या या जीवघेण्या हल्ल्यात ज्योतिबाचाही मृत्यू झाला. गुरुवारी संध्याकाळी या दोघांचे रक्ताळलेले मृतदेह जीवेलीगाव परिसरातील रस्त्यावर आदळून आले. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.

चिमुकल्याने दिली महत्वाची माहिती

पोलिसांनी मनीषाच्या ३ वर्षांच्या लहान मुलाची चौकशी केली असता त्याने महत्वाची माहिती दिली. त्याने सांगितले की “ड्रायव्हर काकाने आईला मारले आहे” या महत्वाच्या माहितीवरून या दुहेरी मृत्यू प्रकरणामागचे धक्कादायक सत्य समोर आले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या घटनेने बदलापूर हादरले आहे.

Pune Crime : आता वाचलीस, पण पुन्हा दिसलीस तर…; पुण्यात महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

💡

Frequently Asked Questions

  • Que: या घटनेतील मृत महिलेचे नाव काय होते?

    Ans: मृत महिलेचे नाव मनीषा भोसले असे होते.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: फोन सतत व्यस्त येत असल्याच्या संशयातून हा वाद झाला होता.

  • Que: या घटनेचा महत्त्वाचा साक्षीदार कोण ठरला?

    Ans: मनीषा भोसले यांचा 3 वर्षांचा मुलगा महत्त्वाचा साक्षीदार ठरला.

Web Title: Badlapur murder case driver uncle killed mom a young childs single sentence unravels the mystery of the double deaths

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.