
Badlapur ovary trafficking rings in 5 states! More than 300 women suspected of being victims
गोरगरिब महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयाची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना बदलापुरमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे रॅकेट महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशापर्यंत पसरल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे धागे-दोरे अनेक ठिकाणी पसरले असावेत, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून यात आणखी कोण कोण सहभाग आहे, याचाही तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
अंडाशय तस्करी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ठाणे, बदलापूर, विठ्ठलवाडी आणि वांगी परिसरता छापे टाकले आहेत. ठाण्यातील काही आयव्हीएफ सेंटरवरही पोलिसांनी छापे टाकल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. या कारवाईत पोलिसांना १० लाखांहून अधिक किमतीचा औधषांचा साठा जप्त केला आहे. या औषधांचा वापर कशासाठी केला जात होता, ती कुणी पुरवली, याचाही शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंडाशय तस्करीचे रॅकेट हे मुंबई, ठाणे परिसरातील अनेक मोठ्या डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलिसांची तीन पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. ठाणे. वांगणी, विठ्ठलवाडी, तसेच, बदलापूरमध्ये पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुलक्षणा गाडेकरसह ३ महिलांना अटक केली आहे. सुलक्षणा गाडेकर ही या प्रकरणाची मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तिच्या घरातून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रे, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पध कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. (Crime news)
पोलिसांनी सुलक्षणा गाडेकरच्या घरावर छापेमारी कऱण्यात आली, यात अनेक संशयास्पद इंजेक्शन्स जप्त करण्यात आली. सुलक्षणा गोरगरिब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयाची तस्करी करायची. या प्रकरणात ३०० हून अधिक पीडित महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे. या महिलांना अंडाशयामागे तब्बल २० हजार रुपये दिले जात होते. तर यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलांना प्रत्येकी ३ हजार रुपये दिले जायचे. त्यानंतर या अंडाशयांची कर्नाटक,केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विक्री केली जायची.
UPSC CSE 2026:UPSC सिविल सेवेसाठी 933 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, आजच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर
रॅकेटची धक्कादायक पद्धत (Modus Operandi):
तपासातून समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. सुलक्षणा गाडेकर आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी बोलवायची. डॉक्टरांच्या कोणत्याही सल्ल्याशिवाय ती महिलांना स्वतःच्या हाताने काही विशिष्ट इंजेक्शन द्यायची, या इंजेक्शन्समुळे महिलांच्या गर्भाशयातील स्त्री-बीजांची कृत्रिमरित्या वाढ होत असेत. इंजेक्शन दिल्यानंतर स्त्री-बीजांच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी ती बेकायदेशीरपणे या महिलांची सोनोग्राफी करायची .
गर्भाशयात स्त्री-बीजांची पूर्ण वाढ झाल्यानंतर ती या महिलांना ठराविक आयव्हीएफ (IVF) सेंटरमध्ये पाठवायची. तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन शस्त्रक्रियेद्वारे महिलांच्या शरीरातील अंडाशय (Ovaries) किंवा स्त्री-बीज काढून घेतले जायचे. ही चोरी केलेली स्त्री-बीजं त्यानंतर इतर राज्यांमध्ये नेऊन चढ्या दराने विकली जात होती.
सुलक्षणा गाडेकरच्या अटकेमुळे या रॅकेटमध्ये मोठे डॉक्टर्स किंवा नामवंत हॉस्पिटलचे कर्मचारी सहभागी आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. कोणत्याही अधिकृत पदवीशिवाय महिलांच्या शरीराशी असा जीवघेणा खेळ खेळल्यामुळे बदलापूर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.