बदलापूर अत्याचार प्रकरणी मुंबई कोर्टात सुनावणी, सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश
बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरलं होतं. याप्रकरणी नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने म्हटले आहे की, या दोन मुलींवर अत्याचार प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
तर दुसरीकडे राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आले असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आता या प्रकरणाची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. बदलापूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली असून आज गुरुवारी (ता. 22 ऑगस्ट) सकाळी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी घेण्यात येणार आहे. या प्रकरणी मंगळवारच्या सुनावणीआधी सरकारला अहवाल सादर करण्याचे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले.
हे सुद्धा वाचा: बदलापूरच्या घटनेनंतर नाना पटोले आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी
एजन्सीच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील बदलापूर, ठाणे येथे शाळेच्या सफाई कामगाराने तीन आणि चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे शहरात तणाव वाढल्यानंतर इंटरनेट बंद करण्यात आले होते, ते पूर्ववत करण्यात आले आहे. या प्रकरणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक बदलापूरला जाणार असल्याचे सांगितले आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला फशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी राज्यातील जनतेकडू करण्यात येत आहे. मात्र आपल्या देशाच्या कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही आणि आरोपीला कायदेशीर मार्गाने कठोर शिक्षा दिली जाईल. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात स्वत:हून याचिका दाखल करण्यात आली असून गुरुवारी सकाळी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
हे सुद्धा वाचा: बदलापूरमध्ये झालेल्या घृणास्पद घटनेवर नागरिक संतप्त! मीरारोडमध्ये छेडलं तीव्र आंदोलन
बदलापूर प्रकरणी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही SIT स्थापन करण्यात आली आहे. परंतु, घडलेल्या प्रकरणाची एसआयटीमार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाकडूनपुढील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली. तसेच पुढील सुनावणीच्या आधी सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याला 26 ऑगस्टपर्यंत कल्याण न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आरोपी अक्षयला न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्यात येते की ऑनलाइनच्या माध्यमातून त्याला हजर करण्यात येते, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.