
crime (फोटो सौजन्य: social media)
बंगळुरू: बंगळुरूतील एका मंदिरात धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने मंदिरात आईने आपल्याच पोटच्या मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी (19 नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास घडली. पण तिने हा टोकाचा पाऊल का घेतला? नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.
नेमकं काय घडलं?
ही घटना बंगळुरूतील थानिसांद्रा मेन रोडवरील अग्रहारा लेआउटमध्ये असलेल्या हरिहरेश्वर मंदिरात घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 4:30 च्या सुमारास आरोपी महिला तिच्या मुलीसह मंदिरात गेली होती. त्यावेळी त्यांनी तिथे पूजा केली आणि नंतर थोडा वेळ मंदिरात बसल्या. या दरम्यान, महिलेने तिच्या 25 वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून, रस्त्याने जाणारे लोक तिथे आले आणि आरोपी आईला मुलीवर हल्ला करण्यास थांबवलं. त्यानंतर तिथल्या स्थानिकांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या मानेवर गंभीर दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेतील जखमी तरुणी विवाहित असून ती तिच्या पतीसोबत राहते. तसेच, आरोपी महिला सुद्धा आपल्या पतीसोबत संपीगेहल्ली येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांचा तपास सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे तिच्या पतीसोबत बऱ्याचवेळा वाद होत होते. ती त्यामुळे सतत तिच्या आईला भेटायला यायची. संबंधीत महिलेला तिच्या वैवाहिक समस्यांपासून सुटका मिळावी म्हणून तिने नुकतंच तिच्या आईसोबत एक विशेष पूजा करायला सुरूवात केली होती. यासाठी, आरोपी महिलेने एका ज्योतिषाचा सल्ला घेतला. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ज्योतिष्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तसेच, जखमी महिलेची प्रकृती ठिक होण्याची वाट पाहत आहेत जेणेकरून पीडितेचा जबाब नोंदवला जाईल आणि नेमकं प्रकरण समोर येण्यासाठी मदत होईल.
Ans: मंदिर
Ans: मुलगी
Ans: ज्योतिष