नेमकं काय घडलं?
मृतक पुजारी मनोज याचे त्याच्या मोठा भाऊ प्रदीप शर्माच्या मेहुणीशी अवैध प्रेमसंबंध होते. प्रदीप शर्माच्या पत्नीने निधन झाले होते. मनोजला मोठ्या भावाच्या मेहुणी सोबत विवाह करायचा होता. त्याने अनेकदा हट्टही धरला पण, कुटुंबाने त्या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला. मुलीच्या कुटुंबाने तिचा विवाह हा हिमांशू नावाच्या तरुणाशी लावून दिला होता. नंतर ती महिला मनोजच्या संपर्कात आली. याच प्रेमसंबंधामुळे हिमांशु आणि त्याच्या पत्नीत सतत खटके उडू लागले. त्याच्या पत्नीने हिमांशुविरूद्ध हुंडाबळीच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली होती. कुटुंब आणि नातेवाईकांनी ताडजोड केली, पण, पुजारी मनोज आणि त्याच्या मेहुणीसोबतचे प्रेमसंबंध तुटता तुटेनासे झाले होते.
लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वारंवार अत्याचार; फोटोही काढले अन् गर्भवती होताच…
याचा राग हिमांशूने मनात साचवून ठेवले आणि अपमानाच्या बदल्यात भयानक कट रचला. दोन मेहुणे, विशेष कुमार उर्फ छोटू आणि नितेश कुमार यांना कटामध्ये सामील केले. १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी नितेश पुजारील ठरल्याप्रमाणे भेटायला गेला होता, नंतर त्यांनी एकत्रितरित्या जेवण केलं. नितेश त्याच ठिकाणी झोपला. मध्यरात्री 1:45 वाजेच्यासुमारास, हिमांशु त्याच्या बाईकवरून आला. त्यानंतर तिघांनी मिळून पुजारी मनोज शंखधरला ताब्यात घेत त्याची गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर तिन्ही आरोपी हिमांशूच्या घरी गेले, त्यांचे कपडे जाळले आणि डीव्हीआरही पेटवून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणाला त्यांनी वेगळं वळण देण्याचं प्रयत्न केला. त्यांनी हत्या करून प्रतीकं दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात दोन चांदीचे मुकुट आणि सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांनी घेतले. या हत्येचा तपास करण्यासाठी एसएसपी डॉ. ब्रिजेश कुमार सिंह यांनी स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप, सर्व्हिलन्स आणि सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनच्या चार पथकांची स्थापना केली. या प्रकरणात आरोपींना अटक केली असून घटनास्थळावरून काही वस्तू जप्त देखील केल्या आहेत.
Nanded Crime: नांदेड हादरलं! कापूस वेचणीदरम्यान दोन सख्ख्या जावांचा गळा दाबून खून
Ans: प्रेमसंबंध
Ans: हिमांशू
Ans: जाळून






