
crime (फोटो सौजन्य: social media)
बंगळुरू: बंगळुरूतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बायकोने घटस्फोट मागितले म्हणून नवऱ्याने तिचे खासगी फोटो वायरल केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी २३ वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुधात तक्रार केली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी हा एका खासगी रिअल इस्टेट कंपनीत फायर अँड सेफ्टी सुपरवायझर म्हणून काम करतो. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया
Beed Crime: बीडमध्ये मोठी कारवाई! कारमधून 1.5 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; दोघे अटकेत
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांची भेट येलहंका येथील एका मॉलमध्ये काम करताना झाली होती. तिथेच मैत्री झाली आणि ही मैत्री वाढत गेली. त्यांनी २०२४ मध्ये लग्न केले. मात्र त्यांच्यात काही महिन्यातच वाद होऊ लागले. तो आपल्या पत्नीची कमाई ऑनलाईन सट्टेबाजी (ऑनलाइन बेटिंग) मध्ये खर्च करू लागला. यामुळेच दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागले. पत्नीला अनेक वेळा त्याने मानसिक त्रास दिले. वैतागून ती बेंगळुरू सोडून आंध्र प्रदेशात आपल्या आई-वडिलांकडे निघून गेली. पण तिथेही तिच्या समस्याच संपल्या नाहीत. नवरा वारंवार फोन करून धमकावू लागला. जर तिने त्याचे ऐकले नाही तर तो तिचे वैयक्तिक आणि अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकेल. तिची प्रतिष्ठा खराब करेल.
हे आपली प्रतिमा खराब होण्याच्या भीतीने महिला परत बेंगळुरूला आली. ती एका पीजीमध्ये राहू लागली. पण आरोपी तिथेही पोहोचला. तिथे जाऊन महिलेला मानसिक छळ करत होता, धमकावत होता आणि सांगत होता जर तिने घटस्फोट घेतला तर तो आत्महत्या करेल आणि तिला त्यासाठी जबाबदार ठरवेल.
महिलेला हे सर्व सहन झाले नाही. तिने पुन्हा घटस्फोट मागितला. यामुळे संतापलेल्या तिच्या पतीने गोविंदराजुने तिचा बदला घेण्यासाठी तिचे वैयक्तिक फोटो Threads वर शेअर केले आणि त्याने तिच्या ११ मित्रांना टॅग करून दिले. हा तिच्यासाठी खूप मोठा धक्का होता. जेव्हा तिच्या मित्रांनी फोन करून सांगितले की तिचे वैयक्तिक फोटो व्हायरल झाले आहेत. हे ऐकून तिला खूप मोठा धक्का बसला. तिने तातडीने पोलिसात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.
चौकशी सुरु
बंगळूरुमधील अमरुतहल्ली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना त्याच दिवशी ताब्यात घेतले. हे प्रकरण आयटी कायद्याच्या कलम ६७ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ८५ अंतर्गत नोंदवले गेले. नंतर आरोपीला स्टेशन बेलवर सोडण्यात आले. सध्या याप्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Nagpur Crime: बालपणीचा राग डोक्यात गेला आणि…, पुतण्याने केली काकाची निर्घृण हत्या; कश्याचा होता राग?
Ans: गोविंदराजू
Ans: बंगळूरू
Ans: घटस्फोट