Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur: चंद्रपूरमध्ये 13 महिन्यांत 82 मृत्यू; महामार्ग की ‘मृत्यूचा सापळा’?

चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान 130 अपघातांत 82 मृत्यू व 84 जखमींची नोंद. भरधाव ट्रक, अरुंद रस्ते व मोकाट जनावरे कारणीभूत. पोलिसांकडून विशेष मोहीम व नियमभंगावर कारवाई सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 25, 2026 | 03:43 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • चंद्रपूर–गडचिरोली, चंद्रपूर–नागपूर, बल्लारपूर–लक्कडकोट
  • भरधाव वेग, रस्त्याच्या कडेला उभे ट्रक, मोकाट जनावरे
  • वाढती औद्योगिक वाहतूक (कोळसा, सिमेंट, विद्युत केंद्रे)
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात गत काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर अपघातांची संख्या वाढत चाललेली आहे. या मार्गावरून भरधाव वेगाने धावणारे ट्रक, ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने यामुळे अपघातांची संख्या वाढलेली आहे. गत १३ महिन्यात एकूण ८२ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे महामार्ग की, मृत्यूचा सापळा ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केल्या जात आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्याचे जाळे पसरले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील चंद्रपूर-गडचिरोली, आष्टी गोंडपिपरी-राजुरा, चंद्रपूर-नागपूर, बरोरा-चिमूर, नागभीड-ब्रह्मपुरी, बल्लारपुर-लक्कडकोट असे ६ राष्ट्रीय महामार्ग आहेत तर ७ इतर मुख्य राज्य मार्ग आहेत. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक, औष्णिक विद्युत केंद्र, सिमेंट कंपन्यांचे ट्रक चालतात. सोबतच प्रवासी बसेस, ट्व्हल्स व इरत चारचाकी दुचाकी वाहने धावतात. मात्र काही वर्षामध्ये – वाहनांच्या संख्येत दुपट्टीने वाढ झालेली – आहे. त्यामानाने काही भागात काँक्रिट रोड – टाकून रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले. – तर काही रस्ते अद्यापही रूंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.

Uttarpradesh Crime: पुन्हा निळा ड्रम प्रकरण! थरारक वेबसिरीज बघितली अन् जन्मदात्याची केली हत्या, 21 वर्षीय मुलाला अटक

काँक्रिट रोडवर भरधाव व नियमांचे उल्लंघन करत धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात होतात. तर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक ट्रॅव्हल्समुळे अनेक अपघात घडत आहेत. अनेकदा महामार्गावर मोकाट जनावरे, वन्यप्राण्यांचे भ्रमण अशा कारणामुळे अपघातांची संख्या वाढलेली आहे. यात जानेवारी २०२५ पासून जानेवारी २०२६ च्या अखेरपर्यंत एकूण १३०. अपघात झालेत.

जखमी व मृत्यूचा आकडा जवळपास सारखाच

१३ महिन्याच्या कालावधीत या अपघातांमध्ये एकूण ८२ जणांना आपला जीव गमावावा लागलेला आहे. तर ८४ जण जखमी झालेले आहेत. त्यामुळे जखमी व मृत्यूचा आकडा जवळपास सारखाच असल्यामुळे हे महामार्ग आहेत की, मृत्यूचा सापळा? असा सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित केल्या जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी चंद्रपूर-मूल मार्गाचे रुंदीकरण करून वेगावर नियंत्रण आणावे. नागपूर-बल्लारपूर मार्गावर उभ्या असणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यात यावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशा मागण्या नागरिकांतून केल्या जात आहेत.

८ महामार्गावरील अपधात टाळण्यासाठी कोळसा खाणीचे अधिकारी, कर्मचारी, ट्रक चालक, ट्रान्सपोर्टर याच्याशी समन्वय साधून जनजागृती करण्यात येत आहे. ट्रक विनाताडपत्री, ओव्हरलोड येणार नाही, याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. महामार्गावरील नियमांचे उल्लंघन करण्यान्या २०२४ मध्ये २५९५९, २०२५ मध्ये २०३५९. तर २०२६ मध्ये आतापर्यंत ३३०० वाहनचारकांवर कारवाई करण्यात आलेली कमी करण्याचा प्रयल सुरू आहे. आहे. विशेष मोहीमा राबवून अपघातांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. – माया चाटसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, महामार्ग चंद्रपूर

पोलीस उपनिरीक्षकाचा सहकारी ACB च्या जाळ्यात; 25 हजार रुपयांसाठी लाच घेताना टक

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघातांची प्रमुख कारणे कोणती?

    Ans: भरधाव ट्रक, अरुंद/रुंदीकरण अपूर्ण रस्ते, रस्त्याकडेला उभी वाहने व मोकाट जनावरे.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: नियमभंगावर हजारोंवर कारवाई व विशेष मोहीमा राबविल्या जात आहेत.

  • Que: नागरिकांची मागणी काय?

    Ans: रस्ते रुंदीकरण, उभ्या ट्रकवर कारवाई व वेगावर नियंत्रण.

Web Title: Chandrapur 82 deaths in chandrapur in 13 months highway or death trap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Accident: विरारमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची जोरदार धडक; शाळेत जात असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू
1

Mumbai Accident: विरारमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची जोरदार धडक; शाळेत जात असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू

UttarPradesh Crime: वाराणसी हादरले! वहिनीच्या बहिणीशी लग्नाचा हट्ट; नकार मिळताच दीराकडून कुऱ्हाडीने हत्या
2

UttarPradesh Crime: वाराणसी हादरले! वहिनीच्या बहिणीशी लग्नाचा हट्ट; नकार मिळताच दीराकडून कुऱ्हाडीने हत्या

Gujrat Crime: कानाखाली मारली चपराक; पत्नीचा संताप अनावर, दगडाने ठेचून पतीची हत्या
3

Gujrat Crime: कानाखाली मारली चपराक; पत्नीचा संताप अनावर, दगडाने ठेचून पतीची हत्या

Pune Crime: संतापजनक! कोचिंग क्लासमध्ये ऑफिस बॉयने आठवीतल्या मुलावर केला लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
4

Pune Crime: संतापजनक! कोचिंग क्लासमध्ये ऑफिस बॉयने आठवीतल्या मुलावर केला लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.