बीड : बीड जिल्ह्यातून सतत गुन्हेगारीच्या बातम्या समोर येत आहेत. आता बीड शहरातील चऱ्हाटा फाटा येथे कारमधून व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी धडक कारवाईक करत दोंघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दीड कोटी रुपयांच्या जवळपास किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Nagpur Crime: बालपणीचा राग डोक्यात गेला आणि…, पुतण्याने केली काकाची निर्घृण हत्या; कश्याचा होता राग?
कशी केली कारवाई?
शिवाजीनगर पोलिसांना माहिती मिळाली होती की, सोन्यापेक्षाही महाग समजल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणारे दोघे बीड शहरात येत आहे. या गोपनीय माहितीच्या आधारे शहरानजीकच्या एका हॉटेलजवळ, चऱ्हाटा फाटा येथे सापळा रचण्यात आला. या दरम्यान दोघांना तातडीने ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत शैलेंद्र प्रभाकर शिंदे आणि विकास भीमराव मुळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या दोघांकडून दीड किलोच्या जवळपास वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. बाजारभावानुसार जप्त करण्यात आलेल्या व्हेल माश्याची उलटीची किंमत दीड कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या उलटी वनविभागाकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली असून, पुढील तपासणीसाठी ती आता प्रयोगशाळेत पाठवली जाणार आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक बांगर यांनी सांगितले.
‘गोल्ड लोन’ घोटाळा! बनावट सोनं गहाण ठेवून अडीच कोटींचा गंडा
बीड पोलिसांनी पुण्यातून बनावट सोनाराला अटक केली आहे. बनावट सोने चांदी बँकेत गहाण ठेवून बँकेची फसवणूक केली होती. या आरोपीने अवघ्या दोन महिन्यात तब्बल अडीच कोटी रुपयांचे घबाड जमा केले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विलास उदावंत असे आहे. तो बीडमध्ये विलास ज्वेलर्स नावाने दुकान चालवत होता. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने स्वतः १६ बनावट ग्राहक तयार केले. या ग्राहकांना बनावट सोने देऊन त्याने ते बँक ऑफ बडोदा बँकेत गहाण ठेवले. सोन्याचे परीक्षण करणारा म्हणून त्याने हे बनावट सोने खरे असल्याचे भासवून बँकेची फसवणूक केली. एवढेच नाही तर सामान्य लोकांना जास्त सोन्याचे आमिष दाखवून त्यांची ही फसवणूक केली. त्याने एकूण अडीच कोटी रुपये जमा केले तो बीडमधील प्रॉपर्टी विकून पसार झाला.
तडीपार गुन्हेगारासह कोयतेधाऱ्यांना ठोेकल्या बेड्या; लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई
Ans: बीड
Ans: दोघे
Ans: दीडकोटी
Ans:






