Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: नात्याला काळिमा! आई माहेरी गेली आणि घडलं भयंकर; नराधम सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

बीडच्या केजमध्ये सावत्र पित्याने 13 वर्षीय मुलीवर आई नसताना लैंगिक अत्याचार केला. मुलीने आईला सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल झाली. आरोपीवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 13, 2026 | 01:22 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आई माहेरी गेली, सावत्र पित्याने केला घृणास्पद कृत्य
  • अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्याकडून अत्याचार
  • गुन्हा दाखल केला असून आरोपी ताब्यात
बीड: बीड जिल्ह्यातील केज शहरात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधम सावत्र पित्याने आपल्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित मुलीची आईला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत. मात्र पहिल्या पतीसोबत पटत नसल्यामुळे ९ वर्षांपूर्वी त्याच्यापासून फारकत घेतली होती. साधारण ८ वर्षांपूर्वी तिने या नराधम आरोपीशी दुसरे लग्न केले. या दुसऱ्या पतीपासून तिला एक मुलगा आहे. ही पीडित मुलगी आपल्या आईसोबत आणि आईने केलेल्या दुसऱ्या पतीसोबत एकाच घरात राहत होती.

९ एप्रिलला पीडित मुलीची आई सकाळी 11:30 वाजता आपल्या माहेरी गावाकडे गेली होती. यावेळी घरात केवळ पीडित मुलगी आणि तिचा लहान भाऊच हजर होते. दुपारी 12:30 च्या सुमारास सावत्र पिता घरी आला आणि त्याने मुलीकडे तिच्या आईबद्दल चौकशी केली. आई कधी परत येणार आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने मुलीला आईला फोन करायला लावला. आईने फोनवर परत यायला वेळ लागेल असे सांगितले. त्याने आपल्या साडेतीन वर्षांच्या लहान मुलाला विचलित करण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल देऊन त्याला खाली बसवले. त्यांनतर मुलीला कॉटवर बसवून तिच्यासोबत लज्जास्पद चाळे करण्यास सुरुवात केली. मुलीने याला कडाडून विरोध केला आणि आईला सांगण्याची धमकी दिली, मात्र आरोपीने “आईला सांगायचे नसते, आपल्यात भांडणे होतील” असे धमकावत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दहा गुन्हेगारांना जिल्ह्यातून केले तडीपार

आई माहेरून परत आली आणि…

काही वेळाने पीडितेची आई माहेरून परत आली. तेव्हा तिला आपली मुलगी कोपऱ्यात बसून रडतांना दिसली. मुलगी प्रचंड घाबरलेली होती ती काहीही बोलत नव्हती. अखेर तिला विश्वासात घेऊन मायेने विचारणा केल्यानंतर मुलीने आपल्यासोबत घडलेल्या त्या काळ्या कृत्याची सर्व माहिती आईला सांगितली. हे ऐकताच आईला मोठा धक्का बसला. तिने तात्काळ पोलिसांत धाव घेतली.

गुन्हा दाखल

१२ एप्रिल रोजी पीडित मुलीच्या आईने केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या तक्रारीवरून सावत्र पित्याविरुद्ध गु. र. नं. 198/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 64 (3)(एफ), 65 (1) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Sangli Crime: संतापजनक! मनोरुग्ण मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाचा टोकाचा पाऊल; डोक्यात दगड घालून मुलाचा खून

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील केज शहरात ही घटना घडली.

  • Que: गुन्हा कसा उघड झाला?

    Ans: पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तक्रार दाखल झाली.

  • Que: आरोपीवर काय कारवाई झाली?

    Ans: पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Beed crime a stain on family ties mother visits her parental home and a horror unfolds depraved stepfather sexually assaults minor daughter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
4

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.