Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: भरदिवसा तरुणावर लोखंडी रॉड-काठ्याने अमानुष मारहाण; व्हिडीओ व्हायरल

बीडच्या शिरूर कासार तालुक्यात शुल्लक कारणावरून तरुणावर चार जणांनी लोखंडी रॉड व काठ्यांनी भरदिवसा अमानुष मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आरोपी फरार आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 25, 2026 | 09:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • शिरूर कासारच्या खालापुरीत हॉटेलसमोर तरुणावर जीवघेणा हल्ला
  • लोखंडी रॉड, काठ्या व चाकूने मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • आष्टीत स्कूटीवरून जाणाऱ्या महिलेकडील 2 तोळ्यांचे मंगळसूत्र चोरीला
बीड: बीडमधून सतत गुन्हेगारी घटना समोर आली आहे. एका तरुणाला चार जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी येथील एका हॉटेलमध्ये शुल्लक कारणावरून लोखंडी रॉड आणि काठ्याने भरदिवसा मारहाण करण्यात आली. यात मारहाण झालेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी घडली आहे.

काय नेमकं घडलं?

मारहाण झालेल्या तरुणाचे नाव नितीन कल्याण लोंढे (३२) असे आहे. नितीन हे गावातील सतीश यांच्या हॉटेलवर मोमीन पठाण यांना तुमच्या मुलाने आमच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात काल सायंकाळी येऊन धिंगाणा केला असे सांगण्यासाठी गेले होते. यावेळी रोहित तुळशीदास गायकवाड, शुभम आण्णा लोंढे, आसिफ मोमीन शेख, साहिल मोमीन पठाण या चौघांनी नितीन लोंढे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मंगळवार रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मारहाण करत हातावर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच उजव्या बाजूच्या बरगडीवर जबर मारहाण केली आहे.

यानंतर नितीन लोंढे यांना तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या चार जणांविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाले आहेत.

पत्नी, तिचा प्रियकर आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल; बीड येथील घटना

बीड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने कौटुंबिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नी, तिचा बॉयफ्रेंड आणि सासूच्या मानसिक त्रासला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. ही घटना बीडच्या केजमध्ये घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तिघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनने परिसर हादरून गेले आहे.

काय नेमकं प्रकरण?

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव उत्तम शिवाजी जाधव असे आहे. तर त्यांच्या पत्नीचं नाव मनीषा जाधव असे आहे. मनीषाचे मयूर पाटील-देशमुख नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु होते. मयूरने तिला व तिच्या दोन मुलांना भाडेतत्वावर घर घेऊन दिले होते, त्याच ठिकाणी ते राहत होते. १९ जानेवारीला घटनेच्या दिवशी उत्तम हा मनीषा राहत असलेल्या घरी गेला. तेव्हा मयूर आणि मनिषाने त्याला जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि पळवून लावले. एवढेच नाही तर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

सासू मंगला भारत खाडे, पत्नी मनिषा, प्रियकर मयूर देशमुख पाटील यांच्या त्रासाला कंटाळून उत्तम जाधवने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. हाउसिंग कॉलनी केज येथे राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीने गळफास घेत जीवन संपवलं. याप्रकरणी आरोपींवर केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मारहाणीची घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी गावात.

  • Que: मारहाणीमागचे कारण काय होते?

    Ans: वाढदिवसाच्या कार्यक्रमातील वादावरून शुल्लक कारणातून हल्ला करण्यात आला.

  • Que: दुसरी घटना कुठे घडली?

    Ans: आष्टी शहरात, मुख्य रस्त्यावर सिनेस्टाईल मंगळसूत्र चोरी झाली.

Web Title: Beed crime a young man was brutally beaten with iron rods and sticks in broad daylight the video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मालाड रेल्वे स्टेशनवर थरार! लोकलमधून उतरताना धक्का लागल्याच्या रागातून चाकूहल्ला; प्रवाशाची हत्या, आरोपी फरार
1

Mumbai Crime: मालाड रेल्वे स्टेशनवर थरार! लोकलमधून उतरताना धक्का लागल्याच्या रागातून चाकूहल्ला; प्रवाशाची हत्या, आरोपी फरार

Mumbai Crime: काळजाचा ठोका चुकवणारी घटना; आईने 15 वर्षीय मुलीची खलबत्याने ने निर्घृण हत्या
2

Mumbai Crime: काळजाचा ठोका चुकवणारी घटना; आईने 15 वर्षीय मुलीची खलबत्याने ने निर्घृण हत्या

Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…;  तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक
3

Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…; तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

Nagpur Crime: दोन हत्याकांडांनी पुन्हा हादरली उपराजधानी! पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
4

Nagpur Crime: दोन हत्याकांडांनी पुन्हा हादरली उपराजधानी! पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.