
Beed Crime, Dharur Police Attack, PSI Babasaheb Bhavar, Stone Pelting, Beed News,
Beed Crime: बीड जिल्ह्यातील धारूर येथे गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपींनी भीषण दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक भवर हे जखमी झाले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. मध्यरात्री पेट्रोलिंगदरम्यान कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस पथकावर मद्यधुंद टोळक्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर थोडक्यात बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर हे आपल्या पथकासह रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या हॉटेल सुरू असल्याचे दिसले. पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर पोलिसांनी संबंधितांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या टोळक्याने पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. “आम्हाला कोणी काही करू शकत नाही,” अशी उघड दादागिरी करत आरोपींनी पोलिसांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. राहुल हजारी या आरोपीने पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली आणि गळा पकडला.
दौंड हादरलं! शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग अनावर; बापानेच केली पोटच्या मुलीची हत्या
धारूर पोलीस पथक आरोपींच्या शोधात असताना ही चकमक झाली. अतिरिक्त पोलीस कुमक मागवल्यानंतर संतापलेल्या आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. यातील एक मोठा दगड थेट उपनिरीक्षक भवर यांच्या छातीला लागल्याने ते जखमी झाले आहेत.
या हल्ल्यात एकूण अमित कांताप्रसाद तिवारी आणि सुजय गोकुळसिंग चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. तर राहुल हजारी, अमित सद्देवाल आणि मोहन रहिकवाल हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. रार झालेल्या राहुल हजारी आणि इतर साथीदारांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. भरवस्तीत आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर अशा प्रकारे हल्ले होत असल्यामुळे पोलीस दलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरला नसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सासरच्या जाचाला कंटाळून भाजप नेत्याने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील नरेला भागातील भाजप मंडळ आणि बँक फील्ड मॅनेजर विनोद मिश्रा यांनी काैटुंबिक त्रासाला कंटाळत १ मे रोजी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये विष प्राशन करत आपले आयुष्य संपवले. मुख्य म्हणजे सासरवाडीच्या घरासमोर जाऊन त्यांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी सर्व घटना शेअर करत त्यांनी कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना एक व्हॉइस रेकॉर्डिंग देखील शेअर केला ज्यात त्यांना मृत्यूसाठी पत्नी आणि सासरच्या मंडळींना आरोपी ठरवले.