Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: दारू पार्टीत वाद अन् 36 वर्षीय तरुणाची हत्या; मृतदेह रेल्वे रुळावर टाकून आत्महत्येचा बनाव, मात्र…

बीडच्या परळीमध्ये पैशांच्या वादातून दोन मित्रांनी 36 वर्षीय तौहिद खानची दगडाने ठेचून हत्या केली. खून केल्यानंतर मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न झाला. मात्र मोकाट कुत्र्यांमुळे हा डाव फसला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 04, 2026 | 12:36 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पैशांच्या वादातून मित्रांनीच तौहिद खानची हत्या केली.
  • मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून आत्महत्येचा बनाव रचला गेला.
  • सीसीटीव्ही, कॉल रेकॉर्ड्स आणि माहितीच्या आधारे आरोपी अटकेत.
बीड: बीड जिल्ह्यातील परळी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून जिवलग मित्रांनीच 36 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. इतकंच नाही, तर खुनानंतर मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून आत्महत्येचा बनाव रचण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, मोकाट कुत्र्यांमुळे आरोपींचा हा डाव फसला आणि संपूर्ण हत्याकांडाचा थरार उघडकीस आला.

हिंजवडी येथील आयटी कंपनी रातोरात बंद; पोलिसांनी ‘थिंकटेक’च्या मालकाला नाशिकमधून पकडले

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव तौहीद असे आहे. तर आरोपीचे नाव ऋषिकेश आणि गौरव असे आहे. ३१ मे रोजी हे तिघे ऋषिकेशच्या कारमधून परळी तालुक्यातील वरवटी शिवारात गेले होते. तिथे त्यांनी दुपारी दारूचे सेवन केले. त्यानंतर रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा पार्टी केली. या पार्टीदरम्यान पैशांच्या देवाणघेवाणीवरून तिघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि ऋषिकेश आणि गौरवने बाजूला पडलेला मोठा दगड उचलून तौहिदच्या डोक्यात मारला. यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध झाला.

मात्र नशेत असलेल्या आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घाबरलेले आरोपी मध्यरात्री सुमारे 1.30 वाजेपर्यंत मृतदेहाजवळच थांबले होते. त्यानंतर त्यांनी तौहीदचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि लेंडेवाडी शिवारातील रेल्वे पटरीवर नेऊन ठेवला. जेणे करून सगळ्यांना वाटले की तौहीदने आत्महत्या केली आहे. मात्र आरोपींचा हा बनाव फसला. आरोपींनी रेल्वे पटरीवर तौहीदचा मृतदेह ठेवल्यावर आरोपी तिथून निघून गेले. त्यावेळी परिसरातील मोकाट कुत्र्यांनी मृतदेह ओढत रेल्वे रुळांबाहेर आणला आणि त्यांचा बनाव फसला.

नागरिकांना आढळला मृतदेह

१ जून रोजी सकाळी स्थानिक नागरिकांना रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच परळी शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित म्हणून ऋषिकेश फड आणि गौरव व्यास यांना ताब्यात घेतले. पोलीस त्यांची चौकशी करत असून या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

लग्न लावून दिले नाही म्हणून संताप; वडील आणि सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून केला खून

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय होते?

    Ans: अबजल उर्फ तौहिद खान कैराती खान असे मृत तरुणाचे नाव होते.

  • Que: आरोपींनी खून लपवण्यासाठी काय प्रयत्न केला?

    Ans: मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.

  • Que: पोलिसांनी आरोपींपर्यंत कसा पोहोच केला?

    Ans: सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.

Web Title: Beed crime argument at a liquor party leads to murder of 36 year old man body dumped on railway tracks to stage a suicidebut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.