Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime News : पतीच्या त्रासाला कंटाळून ३० वर्षीय विवाहितेचे टोकाचे पाऊल; परळीतील घटनेने हळहळ

लग्नानंतर सुरळीत सुरू असलेला संसार हळूहळू वादांच्या भोवऱ्यात अडकला. पतीच्या दारूच्या व्यसनामुळे घरात वारंवार भांडणे होत असल्याचा आरोप आहे. अखेर परळी परिसरातील ३० वर्षीय विवाहितेच्या मृत्यूने खळबळ उडाली. रात्री नेमकं काय घडलं? नातेवाइकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 20, 2026 | 10:32 AM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • दारूच्या व्यसनामुळे घरात सतत वाद
  • ३० वर्षीय विवाहितेचा मृत्यू,
  • पतीविरोधात गुन्हा दाखल, परळी परिसरातील घटना

बीड : पतीच्या दारूच्या व्यसनामुळे आणि घरातील सततच्या वादांमुळे एका विवाहितेला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून परळी परिसरातील ३० वर्षीय विवाहितेने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शीतल बापूराव लोंढे असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

२०२० मध्ये विवाह; ऊसतोडीच्या कामावर संसाराचा गाडा

मिळालेल्या माहितीनुसार, शीतल लोंढे यांचा विवाह २०२० मध्ये बापूराव लोंढे याच्यासोबत झाला होता. दोघेही ऊसतोडीचे काम करून उदरनिर्वाह करत होते. सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, कालांतराने पतीच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे घरात वारंवार वाद होऊ लागल्याचे सांगण्यात येते. दारूच्या नशेत पतीकडून भांडण आणि शिवीगाळ होत असल्याने शीतल मानसिक तणावात होती, असा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.

हेही वाचा: Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबाराचा १५ तासांत छडा; AI तंत्रज्ञानाने आरोपी कोट्यात जेरबंद

रात्री वाद झाला अन् काही वेळाने घडली दुर्दैवी घटना

१७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पती दारू पिऊन घरी आला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळाने वाद थांबल्यानंतर दोघेही झोपण्यासाठी गेले. मात्र, रात्री उशिरा घरातून रडण्याचा आवाज आल्याने नातेवाइकांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता शीतल गंभीर अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

पतीविरोधात गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेनंतर शीतलच्या नातेवाइकांनी पतीच्या कथित छळाला कंटाळून तिने जीवन संपवल्याचा आरोप केला. त्यांच्या तक्रारीवरून परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, तपासातून नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे. तरुण विवाहितेच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पतीविरोधात कोणता आरोप करण्यात आला आहे?

    Ans: पतीच्या दारूच्या व्यसनामुळे वारंवार वाद होत असल्याचा आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील परळी परिसरातील अण्णाभाऊ साठे नगर येथे ही घटना घडल्याची माहिती आहे.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली

    Ans: नातेवाइकांच्या तक्रारीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Beed parli married woman death husband harassment case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • Beed Case
  • Beed Crime

संबंधित बातम्या

Beed Crime: शाळा सुटली की सुरू व्हायचा शिक्षकाचा काळा खेळ; चौथीच्या मुलींच्या छळाने बीड हादरले
1

Beed Crime: शाळा सुटली की सुरू व्हायचा शिक्षकाचा काळा खेळ; चौथीच्या मुलींच्या छळाने बीड हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.