काय घडलं नेमकं?
पुणे येथून पाच जणांची एक टोळी केज तालुक्यातील नांदूर घाट शिवारात तारा चोरण्याचा उद्देशाने आली होती. शनिवारी रात्रीच्या सुमारास हे चोरटे हायव्होल्टेज टॉवरवर चढले आणि तारा कापण्याचे काम सुरू केले. मात्र, याच दरम्यान टॉवर जमिनीवर कोसळला. या भीषण दुर्घटनेत अविनाश पाटोळे आणि आकाश आडे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
Amravati Crime: अमरावतीत निर्घृण कृत्य; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार, 5 आरोपी जेरबंद
घटनेनंतर घाबरलेल्या इतर तीन साथीदारांनी (आकाश पेठे, दीपक भगत आणि वैभव आदत) पोलिसांन पासून वाचण्यासाठी बनाव रचला. त्यांनी या मृत्यूला रस्ते अपघाताचे स्वरूप दिली आणि दोन्ही मृतदेह एका कारमध्ये टाकून त्यांनी थेट परभणी गाठले. परभणीत पोहोचल्यानंतर मृतदेह गाडीतच सोडून तिघेही साथीदार तिथून पसार झाले.
त्यांनतर गाडीच्या चालकाने जेव्हा रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मृतांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती मिळाली. नातेवाईकांनी चौकशीची मागणी केली असता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला तेव्हा अपघाताचा बनाव उघड झाला.
पोलीस तपास सुरु
पोलीस या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. टॉवर नेमका कसा कोसळला आणि या टोळीचे आणखी कुठे जाळे पसरलेले आहे का? याचा देखील तपास पोलीस करत आहेत. सध्या पसार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत असून या घटनेने बीड जिल्हात खळबळ उडाली आहे.
संतापजनक! अडीच वर्षांच्या चिमुकलीवर नातेवाईकाकडून अत्याचार; आरोपी ताब्यात
बीड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहून आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला. घडलेली घटना बीड जिल्यातील अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Ans: तारा चोरी करताना हायव्होल्टेज टॉवर कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाला.
Ans: त्यांनी मृत्यूला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.
Ans: पोलिस तपास आणि नातेवाईकांच्या चौकशीतून सत्य समोर आले.






