crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
बीड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेवर अमानुषपणे अटायचार करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेच्या घरात घुसून एका आरोपीने तिच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि तिच्यावर विनयभंग करत अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिच्या पती आणि नातेवाईकांनाही धमकी दिल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.पीडित ४७ वर्षीय महिला ही शेतातील काम आटोपून घरी परतली. तिने घराचे कुलूप उघडताच, पाळत ठेवून बसलेला आरोपी विकास बबन गोरे घरात घुसला. त्याने पीडित महिलेवर अचानक मिरचीची पूड टाकली आणि महिलेला जमिनीवर पाडलं. तिचा विनयभंग करत अत्याचार केला. या अचानक झालेल्या हल्ल्याने महिला घाबरली आणि ओरडू लागली. हे ओरडणं ऐकून तिचा पती, भाऊ आणि भाचा घटनास्थळी धावून आले. आरोपीने त्यांना बघताच तिघांनाही मारहाण केली आणि “एका-एकाला गाठून जीवे मारीन” अशी धमकी दिली. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.
पोलीस तपास सुरु
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेचा जबाब नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणी विकास बबन गोरे याच्याविरोधात विनयभंग
बलात्कार आणि धमकी देण्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या फरार आरोपीचा शोध घेण्यास सुरु केले आहे. या प्रकारामुळे गावकऱ्यांनी आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. या प्रकारामुळे भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
४ महिन्याच्या बाळाला बॅरलमध्ये टाकून वडिलांची आत्महत्या
बीडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका चार महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बॅरेलमध्ये टाकून वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील तालवाडा येथील तहत रामनगर येथे घडली आहे.
BJP Leader Murder: ओडिशामध्ये भाजप नेते पिताबास पांडाची गोळ्या घालून हत्या; परिसरात खळबळ