काय घडलं नेमकं?
आरोपींनी पीडित मुलीचा गोड बोलून तिला घरात बोलावून आपल्या घरी नेले. मुलगी घरात येताच त्यांनी आतून दरवाजा बंद केला. नंतर आरोपीने पीडितेच्या हातपाय बांधले आणि तिच्या तोंडात बोळा कोंबला. नराधमांनी गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यांनतर आरोपींनी मुलीला ‘जर हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला जीवे मारून टाकू,’ अशी धमकी दिली आणि तिला सोडून दिले.
Mumbai Crime: कामाचा बहाणा करत बोलावून घेतले, नंतर झुडपात नेऊन…; अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
पीडित मुलीने घरी गेल्यांनतर घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळपणे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित नराधमांवर लैंगिक अत्याचाराचा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. आरोपींना लवकर अटक केली जावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
बीडमध्ये संतापजनक प्रकार! झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेले; अत्याचार केला आणि…
बीड जिल्ह्यातील एका गावामध्ये धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिला गावामध्ये आणून गावाच्या चावडीवर खांबाला बांधले. घडलेला सगळा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी समोर आला. गावकऱ्यांनी पीडित विवाहितेची सुटका केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेले; अत्याचार केला आणि…
Ans: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावले नंतर दोन नराधमांनी तिच्यावर निर्घृणपणे अत्याचार केला
Ans: बीड तालुक्यातील धारावती तांडा येथे घडली
Ans: 'जर हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला जीवे मारून टाकू,' अशी धमकी दिली






