काय घडलं नेमकं?
बीड जिल्ह्याच्या हिवरापाडी येथे घडली. ११ मार्च रोजी आपल्या घरी पीडित विवाहिता झोपली असता गावातील वैभव पटेकर याने पीडितेला उचलून नेले. पीडितेने याला विरोध केले असता तिचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने तिला नदीकडील परिसरात नेण्यात आले. तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यांनतर तिला गावातील चावडीवर असलेल्या खांबाला बांधून तो पळून गेला. सकाळी ग्रामस्थांनी पीडितेला खांबाला बांधलेलं पाहिले तेव्हा ही घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी घटनेचा व्हिडीओ बनवला असून तोही माध्यमांत समोर आला आहे.
गावचे सरपंच, गावातील ज्येष्ठ आणि कुटुंबातील सदस्य आल्यानंतरच या महिलेची खांबापासून सुटका करण्यात आली. घडल्या प्रकाराने विवाहिता प्रचंड घाबरलेली होती, त्यामुळे तिने पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली नाही. त्यानंतर, कुटुंबीयांना घडलेली संपूर्ण घटना सांगितल्यावर पीडित अल्पवयीन विवाहितेने पोलिसांत फिर्याद दिली.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने १७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. पीडित ही अल्पवयीन असल्याने आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.
Beed Crime: ‘बाजूला हो’ म्हणल्याचा राग; बीडमध्ये हॉटेल वेटरला अमानुष मारहाण, CCTV समोर
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून हॉटेलमधील वेटरला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या मारहाणीची सीसीटीव्हीही देखील समोर आली आहे. ही घटना बीडच्या तेलगाव येथे घडली.
Ans: बीड जिल्ह्यातील हिवरापाडी गावात.
Ans: तिला घरातून उचलून नेऊन अत्याचार करण्यात आला आणि नंतर चावडीवर खांबाला बांधून ठेवले.
Ans: हो. पिंपळनेर पोलिसांनी आरोपी वैभव पटेकरला अटक केली असून 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.






