Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: ‘माझ्यासोबत संबंध ठेव’… नकार देताच विवाहितेचा विनयभंग; पती, मुलांना जीवे मारण्याची धमकी

बीडच्या केज तालुक्यात विवाहितेचा विनयभंग करून पती, सासरा आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने यापूर्वीही अनैतिक संबंधांची मागणी केली होती. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 14, 2026 | 02:28 PM
धक्कादायक ! कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून पीडितेला केलं ब्लॅकमेल; अत्याचार केला अन्...

धक्कादायक ! कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून पीडितेला केलं ब्लॅकमेल; अत्याचार केला अन्...

Follow Us
Follow Us:
  • 29 जून रोजी रस्त्यावर उभ्या विवाहितेचा विनयभंग केल्याचा आरोप.
  • आरोपीने यापूर्वीही अनैतिक संबंधांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा.
  • पीडितेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; तपास सुरू.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या विवाहितेजवळ जात एकाने नको ते कृत्य केले. एवढेच नाही तर पती, सासरा आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेने पोलिसांत धाव घेतली असून आरोपीवर केज पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

काय नेमकं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ जून रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित विवाहिता आपल्या गावातील रस्त्याच्या कडेला उभी असताना आरोपी नानासाहेब शिवाजी बिक्कड हा जीप घेऊन तेथे आला. त्याने विवाहितेजवळ जाऊन तिच्यासोबत अश्लील वर्तन करत विनयभंग केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली.

Nashik Crime: आम्हाला मारून टाकणार होते…; गाडी अडवून काचा फोडल्या, टोलनाक्याचे बॅरिकेड तोडून पर्यटक कुटुंबाने वाचवला जीव

तीन महिन्यांपासून त्रास सुरू असल्याचा आरोप

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून तिला सातत्याने त्रास देत होता. त्याने फोन करून तिच्याकडे अनैतिक संबंधांची मागणी केली होती. मात्र, महिलेने त्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपीने तक्रार केल्यास पती, सासरा आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून नानासाहेब शिवाजी बिक्कड याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंगासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीच्या भूमिकेचा सखोल तपास केला जात आहे.

बीडमध्ये मध्यरात्री थरार! किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाचा चाकूने निर्घृण खून

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे मध्यरात्री किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित हत्याकांडात झाले. साठे चौकात काही जणांनी 21 वर्षीय ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे याच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला असून, दुसऱ्या मित्राने प्रसंगावधान राखत घटनास्थळावरून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Uttar Pradesh Crime : पत्नीला परत मिळवायचं असेल तर आईला मारुन टाक… सासूच्या अटीवर मुलाने आईला दिले विष

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: केज तालुका, बीड.

  • Que: पीडित महिलेने आरोपीवर कोणता आरोप केला आहे?

    Ans: विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Beed crime married woman molested after refusing demand for sexual relations threatened with the killing of her husband and children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.