काय घडलं नेमकं?
पूजा प्रमोद सुरवसे (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. पूजा ही मूळची परभणी येथील रहिवासी. वर्षभरापूर्वीच प्रमोद सुरवसे याच्याशी तीच लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही आनंदाने सुरू होते. मात्र काही दिवसांनंतर व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सतत मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचे पूजाने आपल्या कुटुंबियांना सांगितले होते. याच छळाला कंटाळून पूजाने गेवराई शहरातील गजानन नगर परिसरात राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Mira Bhayandar मध्ये मोठी दहशतवादविरोधी कारवाई; फरार आरोपी हुजैफा दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात
घटनेच्या दिवशी तिच्या कुटुंबियांशी पूजाचा संपर्क झाला होता. मात्र सायंकाळी तिच्या वडिलांना फोन करून मुलीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने गेवराई येथील शासकीय रुग्णालय गाठले असता तेथे पूजाचा मृतदेह आढळून आला. यानंतर मृत महिलेच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल
पती प्रमोद साईनाथ सुरवसे, सासरे साईनाथ बापुराव सुरवसे, सासू उषाबाई उर्फ जिजी साईनाथ सुरवसे, दीर गणेश साईनाथ सुरवसे, जाऊ आरती गणेश सुरवसे आणि नणंद अर्चना तुळसे अश्या सहा जणांवर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी दिली आहे.
घरासमोर लघुशंका आणि जुगार अड्ड्याला दलित महिलेचा विरोध; महिलेच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण, एवढेच नाही तर…
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील जुगाराच्या अड्ड्याला एका महिलेने विरोध केल्याने एका दलित महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थक असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आरोपी निखिल आबूज आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंजेगाव येथे घडली.
Ans: आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव पूजा प्रमोद सुरवसे आहे.
Ans: व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत छळ केला जात होता.
Ans: गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.






