crime (फोटो सौजन्य: social media )
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार युवकांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकणी लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करत आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कानाखाली मारल्याच्या राग अनावर; लोखंडी हत्याराने सपासप वार करून तरुणाला संपवल
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी ओळखीचा गैरफायदा घेत बळजबरीने तिच्यावर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकणी सामूहिक शारीरिक अत्याचार केले. करण साळवे, वैभव यादव, लखन कांबळे आणि दशरथ ढगे अशी आरोपींची नावे आहे. अत्याचारानंतर अल्पवयीन पीडितेला धमकावून गप्प ठेवले जात होते. मात्र पीडितेची मासिकपाळी बंद झाल्याने तिची चाचणी केली असता तिची गर्भधारणा झाल्याचं समोर आले आहे. तिला एका खाजगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर ती पाच महिन्याची घरभवती असल्याचे निष्पन्न झाले.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींच्या नातेवाईकांनी गर्भपात करण्यासाठी दबाव आल्याचेही फिर्यादीत नमूद केलं आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे. या घटनेने संपूर्ण बीडजिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
ट्रॅव्हल्समधून महिलेने अर्भकाला फेकले रस्त्यावर; वाटेत प्रसूती होताच केलं कृत्य
दरम्यान, परभी येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका महिलेने चक्क ट्रॅव्हल्समधून अर्भकाला रस्त्यावर फेकल्याची घटना घडली आहे. ही धक्कदायक घटना पाथरी येथील देवनांद्रा परिसरात पहाटेच्या सुमारास घडली आहे. ऋतिका ढेरे असे या महिलेचे नाव असून, तिचा साथीदार अल्ताफ शेख अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत. पाथरी तालुक्यातील सेलू रोडवरील देवनांद्रा परिसरात ही घटना घडली. प्रवासी ट्रॅव्हल्समधून नवजात अर्भक रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ही घटना मंगळवारी (दि.१५) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. डायल ११२ वर प्राप्त झालेल्या माहितीनंतर, पोलीस अंमलदारांनी तात्काळ सेलू रोडवरील देवनांद्रा परिसरात धाव घेतली. घटनास्थळी काळसर-निळसर रंगाच्या कपड्यात गुंडाळलेले नवजात अर्भक रस्त्याच्या कडेला आढळले.
दरम्यान, या ठिकाणी हजर असलेल्या नागरिकांनी अर्भक एका पांढऱ्या रंगाच्या ट्रॅव्हल्समधून फेकण्यात आले असून, गाडीवर संत प्रयाग ट्रॅव्हल्स असे नाव होते. ट्रॅव्हल्सची माहिती घेतली असता, संबंधित गाडी पुणे-परभणी व्हाया सेलू अशी सेवा करणारी असल्याचे निष्पन्न झाले.
तपासात, प्रवासादरम्यान एका महिलेला प्रसूती वेदना झाल्या व ट्रॅव्हल्समध्येच प्रसूती झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नवजात अर्भक नको असल्याने गाडीतून रस्त्यावर फेकल्याची कबुली संबंधित दोघांनी दिली. या प्रकारामुळे नवजात अर्भकाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.