Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेले; अत्याचार केला आणि…

बीड जिल्ह्यातील हिवरापाडी येथे अल्पवयीन विवाहितेला घरातून उचलून नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. अत्याचारानंतर तिला गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवले. ग्रामस्थांनी सकाळी सुटका केली; आरोपी वैभव पटेकर अटकेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 15, 2026 | 08:27 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 11 मार्च रोजी पीडितेला घरातून उचलून नेऊन नदीकाठी अत्याचार.
  • अत्याचारानंतर गावाच्या चावडीवर खांबाला बांधून आरोपी फरार.
  • पिंपळनेर पोलिसांनी आरोपीला अटक; पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई.
बीड: बीड जिल्ह्यातील एका गावामध्ये धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिला गावामध्ये आणून गावाच्या चावडीवर खांबाला बांधले. घडलेला सगळा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी समोर आला. गावकऱ्यांनी पीडित विवाहितेची सुटका केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

बीड जिल्ह्याच्या हिवरापाडी येथे घडली. ११ मार्च रोजी आपल्या घरी पीडित विवाहिता झोपली असता गावातील वैभव पटेकर याने पीडितेला उचलून नेले. पीडितेने याला विरोध केले असता तिचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने तिला नदीकडील परिसरात नेण्यात आले. तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यांनतर तिला गावातील चावडीवर असलेल्या खांबाला बांधून तो पळून गेला. सकाळी ग्रामस्थांनी पीडितेला खांबाला बांधलेलं पाहिले तेव्हा ही घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी घटनेचा व्हिडीओ बनवला असून तोही माध्यमांत समोर आला आहे.

Kalyan Crime : 9 वर्षाच्या लहानग्यासमोर वडिलांनी आईवर केले वार अन्…; 25 वर्षीय महिलेच्या हत्येने कल्याण हादरलं

गावचे सरपंच, गावातील ज्येष्ठ आणि कुटुंबातील सदस्य आल्यानंतरच या महिलेची खांबापासून सुटका करण्यात आली. घडल्या प्रकाराने विवाहिता प्रचंड घाबरलेली होती, त्यामुळे तिने पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली नाही. त्यानंतर, कुटुंबीयांना घडलेली संपूर्ण घटना सांगितल्यावर पीडित अल्पवयीन विवाहितेने पोलिसांत फिर्याद दिली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने १७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. पीडित ही अल्पवयीन असल्याने आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

Beed Crime: ‘बाजूला हो’ म्हणल्याचा राग; बीडमध्ये हॉटेल वेटरला अमानुष मारहाण, CCTV समोर

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून हॉटेलमधील वेटरला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या मारहाणीची सीसीटीव्हीही देखील समोर आली आहे. ही घटना बीडच्या तेलगाव येथे घडली.

Bihar Crime : अपहरण नंतर निर्जन भागात नेऊन…! 13 वर्षीय विद्यार्थिनीवर 4 अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील हिवरापाडी गावात.

  • Que: पीडितेसोबत काय घडले?

    Ans: तिला घरातून उचलून नेऊन अत्याचार करण्यात आला आणि नंतर चावडीवर खांबाला बांधून ठेवले.

  • Que: आरोपीला अटक झाली का?

    Ans: हो. पिंपळनेर पोलिसांनी आरोपी वैभव पटेकरला अटक केली असून 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Beed crime outrageous incident in beed sleeping minor married girl abducted sexually assaulted and then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार
1

Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार

Yavatmal Crime: सोन्याच्या नथीसाठी 6 वर्षीय मुलीची हत्या; एकाच कुटुंबातील 5 जण अटकेत; काय घडलं नेमकं?
2

Yavatmal Crime: सोन्याच्या नथीसाठी 6 वर्षीय मुलीची हत्या; एकाच कुटुंबातील 5 जण अटकेत; काय घडलं नेमकं?

Dehradun Crime: डेहराडूनमध्ये पत्नीची हत्या करून मृतदेह पोत्यात फेकला; 2,500 CCTV तपासातून पती गजाआड
3

Dehradun Crime: डेहराडूनमध्ये पत्नीची हत्या करून मृतदेह पोत्यात फेकला; 2,500 CCTV तपासातून पती गजाआड

Beed Crime: बीडमध्ये नात्याला काळीमा; चुलत्याकडून पुतणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार, आरोपी फरार
4

Beed Crime: बीडमध्ये नात्याला काळीमा; चुलत्याकडून पुतणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार, आरोपी फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.