Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: ‘गोल्ड लोन’ घोटाळा! बनावट सोनं गहाण ठेवून अडीच कोटींचा गंडा; बीड पोलिसांनी पुण्यात पकडला सोनार

बीड पोलिसांनी पुण्यातून विलास उदावंत नावाच्या सोनाराला अटक केली. बनावट सोने-चांदी गहाण ठेवून बँकेची व लोकांची अडीच कोटींची फसवणूक केली होती. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १८ किलो सोने-चांदी जप्त केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 06, 2025 | 09:25 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • बनावट सोनाराची अटक
  • अडीच कोटींची फसवणूक
  • १८ किलो सोने-चांदी जप्त
बीड: बीड पोलिसांनी पुण्यातून बनावट सोनाराला अटक केली आहे. बनावट सोने चांदी बँकेत गहाण ठेवून बँकेची फसवणूक केली होती. या आरोपीने अवघ्या दोन महिन्यात तब्बल अडीच कोटी रुपयांचे घबाड जमा केले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विलास उदावंत असे आहे. तो बीडमध्ये विलास ज्वेलर्स नावाने दुकान चालवत होता. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने स्वतः १६ बनावट ग्राहक तयार केले. या ग्राहकांना बनावट सोने देऊन त्याने ते बँक ऑफ बडोदा बँकेत गहाण ठेवले. सोन्याचे परीक्षण करणारा म्हणून त्याने हे बनावट सोने खरे असल्याचे भासवून बँकेची फसवणूक केली. एवढेच नाही तर सामान्य लोकांना जास्त सोन्याचे आमिष दाखवून त्यांची ही फसवणूक केली. त्याने एकूण अडीच कोटी रुपये जमा केले तो बीडमधील प्रॉपर्टी विकून पसार झाला.

Uttar Pradesh: चार मुलांना सोडून पत्नी प्रियकरासोबत पळाली; नवऱ्यावर गंभीर आरोप, दुसऱ्या पुरुषसोबत संबंध ठेवायला…

नेमकं प्रकरण काय?

विलास उदावंत (रा. पंडितनगर, नगररोड, बीड) असे आरोपीचे नाव आहे. तो बीडमध्ये ‘विलास ज्वेलर्स’ नावाचे दुकान चालवत होता. जलद श्रीमंत होण्यासाठी त्याने स्वतः १६ बनावट ग्राहक तयार केले. या ग्राहकांना बनावट सोने देऊन त्याने ते बैंक ऑफ बडोदा या बँकेत गहाण ठेवले. सोन्याचे परीक्षण करणारा म्हणून त्याने हे बनावट सोने ‘खरे’ असल्याचे भासवून बँकेची फसवणूक केली. याचबरोबर, त्याने सामान्य लोकांना जास्त सोन्याचे आमिष दाखवून त्यांचीही फसवणूक केली आणि सर्व मिळून अडीच कोटी रुपये जमा करून तो येथील प्रॉपर्टी विकून पसार झाला होता.

पोलिसांची धडक कारवाई

याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तो पुण्यातील देहू गाव येथे ‘व्यंकटेश ज्वेलर्स’ नावाने दुकान चालवत असल्याचे समोर आले. मोबाईल लोकेशन वरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि पुण्यातून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या तांब्यातून १८ किलो सोने- चांदी जप्त करण्यात आली. पोलिसांनी नागरिकांना अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे, तसेच बँकांना सोन्याचे परीक्षण करणाऱ्याची पूर्ण खात्री करून घेण्याची सूचना दिली.

Jalna: संभाजीनगर बोर्डखाली केली लघुशंका, ठरला ट्रोलिंगचा बळी, २८ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Web Title: Beed crime rs 25 crores embezzled by pledging fake gold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 09:25 AM

Topics:  

  • Beed Crime
  • crime
  • Pune

संबंधित बातम्या

Thane Crime: पत्नी नांदायला येत नाही म्हणून दारुड्या जावयाचा हैदोस; सासू-सासऱ्यांना लाकडी फळीने बेदम मारहाण
1

Thane Crime: पत्नी नांदायला येत नाही म्हणून दारुड्या जावयाचा हैदोस; सासू-सासऱ्यांना लाकडी फळीने बेदम मारहाण

Pune Crime: प्रेमप्रकरणाच्या वादातून कात्रजमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
2

Pune Crime: प्रेमप्रकरणाच्या वादातून कात्रजमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Chandrapur Kidney Trafficking: चंद्रपूरपासून कंबोडियापर्यंत किडनी तस्करीचं जाळं! ‘डॉक्टर’ बनलेल्या इंजिनिअरचा पर्दाफाश
3

Chandrapur Kidney Trafficking: चंद्रपूरपासून कंबोडियापर्यंत किडनी तस्करीचं जाळं! ‘डॉक्टर’ बनलेल्या इंजिनिअरचा पर्दाफाश

Bengaluru Crime: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; भररस्त्यात अडकवत गोळ्या झाडून केली हत्या, नंतर थेट पोलीस ठाण्यात केले सरेंडर
4

Bengaluru Crime: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; भररस्त्यात अडकवत गोळ्या झाडून केली हत्या, नंतर थेट पोलीस ठाण्यात केले सरेंडर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.