जालना : जालनामधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाच्या ट्रोलिंगला बळी पडत एका २८ वर्षीय तरुणाने विहिरीत उडीघेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर नामफलकाच्या बोर्डखाली लघुशंका करतानाचा दोन मित्रांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या वायरल व्हिडीओमुळे नेटीझन्सकडून धमक्याही येऊ लागल्या. त्यामुळे, या तरुणांनी माफीनाम्याचा देखील एक व्हिडीओ बनवला होता. त्याच्या माध्यमातून माफ़ू मागण्यात आली. तरीही धमक्या काही थांबल्या नाही. यालाच कंटाळून २८ वर्षीय महेश आडे याने आत्महत्या केली.
नेमकं काय प्रकरण?
काही दिवसांपूर्वी दोन तरुण छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरील संभाजीनगर नावाच्या पिवळ्या बोर्डखाली लघुशंका करताना आढळून आले होते. त्यावेळी, तिथे एका तरुणाने या लघुशंका करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ काढला होता. लघुशंका करणारे दोन्हीही तरुण नशेत असल्याचं समोर आलं होतं. या दोन्हीही तरुणांचा दुसऱ्या दिवशी माफीचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यामध्ये, दोन्हीही तरुणांनी त्यांच्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली होती.
त्यांनतर देखील या तरुणांचे व्हिडिओज अनेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हायरल करण्यात आले, यात शिवसेना छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ हे देखील होते. त्यामुळे, मुलांना रोज धमकीचे मेसेज आणि फोन येत होते. याच धमक्यांना आणि ट्रोलिंगमुळे कंटाळून २८ वर्षीय महेश आडे या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी हे सगळं मला सहन होत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीन असं महेश आडे याने मित्रांजवळ बोलूनही दाखल होतं. त्यानंतर, विहिरीत उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. ही घटना ढोकमळ तांडा येथे ही घटना घडली आहे. त्यानंतर, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करा, धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत कुटुंबीय व नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली असून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Latur Crime: लातूरमध्ये दुहेरी हत्याकांड! पिता-पुत्राचा धारदार शस्त्राने खून, गावात भीतीचं सावट






