
crime (फोटो सौजन्य: social media)
धाकट्या भावाने केला थोरल्या भावाचा खून; झोपेत असताना धारदार शस्त्राने वार केला अन्…
काय घडलं नेमकं?
सराटेवडगावातील शेळके वस्तीवर ग्यानबा राजपुरे आणि बाळू राजपुरे हे दोन्ही भाऊ आपापल्या कुटुंबीयांसह राहतात. रविवारी त्यांच्या घरी चुलत्याच्या वार्षिक श्राद्धानिमित्त नातलग आणि पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर काम आणि पाहुण्यांची ये- जा याने कुटुंबातील सदस्यांना थकवा जाणवला होता. रात्री सर्वजण गाढ झोपेत असतांना, साधारण एक ते सव्वाएक वाजता पाच-सहा दरोडेखोरांनी ग्यानबा राजपुरे यांच्या घराचा दरवाजा लाथ मारून उघडला.
याने आवाज झाला आणि घरातील लोक जागे झाले. ग्यानबा यांच्या आईने विरोध करत आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा निर्दयी दरोडेखोरांनी त्यांच्या छातीवर आणि मानेवर पाय ठेवून तिला जमिनीवर दाबले. आरोपींकडे मोठी हत्यारे होती. त्यांनी दाम्पत्याच्या कपाळावर हत्यार रोखून प्राणघातक धमक्या दिल्या. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले.
घरातून सोन्याचे दागिने तसेच काही रोख रक्कम लुटल्यानांतर आरोपींनी शेजारी राहणाऱ्या बाळू राजपुरे यांच्या घराकडे धाव घेतली. त्या घरातील सदस्यांना सुद्धा मारहाण केली. त्यांच्याकडे मौल्यवान वस्तू आणि पैसे आरोपी तरुणांनी चोरून नेले आणि तेथून फरार झाले. आरोपींनी त्यांना मारहाण केल्याने दोन्ही कुटुंबांना जखमा झाल्या.
राजपुरे परिवाराने अंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा पूर्ण केला आणि अज्ञात आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पथके देखील तयार करण्यात आली आहेत. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहे.
Ans: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव (अंभोरा पोलीस स्टेशन हद्द) येथे.
Ans: घराचा दरवाजा तोडून महिलांना धमकावत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली.
Ans: अज्ञात आरोपींविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत