धाकट्या भावाने केला थोरल्या भावाचा खून; झोपेत असताना धारदार शस्त्राने वार केला अन्... (संग्रहित फोटो)
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच आता वैजापूर तालुक्यातील एका कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच पोलिस खात्यात असलेल्या थोरल्या भावाचा निर्घृण खून केला. ही धक्कादायक बाब आता उघडकीस आली आहे.
विशेष म्हणजे माहिती मिळाल्यानंतर खुनाचा गुन्हा अवघ्या तीन तासांत उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला बेड्या ठोकल्या. लहानू रामजी दिवेकर (रा. बाळ्हेगाव) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला पुढील तपासासाठी शिवूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. नानासाहेब रमाजी दिवेकर (वय ५३ रा. बळ्हेगाव ता. वैजापूर) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते बळहेगाव (ता. वैजापूर) येथील रहिवासी असून, ते सध्या कन्नड तालुक्यातील देवगाव (रंगारी) पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून कार्यरत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते गावात कोणाच्या नजरेस पडले नव्हते. त्यामुळे शिऊर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.
तर दुसरीकडे नानासाहेब यांचा मोबाईल त्यांच्या बिछान्याखाली पडलेला होता. याशिवाय रक्ताचे डागही आढळून आले. त्यामुळे घरातील सदस्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर दिवेकर यांच्या घरालगत असलेल्या एका पडिक घरात त्यांचा मृतदेह पुरून ठेवल्याचे समोर आले. या प्रकरणात सहाय्यक निरीक्षक वैभव रणखांब यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेदेखील वाचा : Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहाय्यक निरीक्षक पवन इंगळे, वैभव रणखांब, उपनिरीक्षक महेश घुगे, केतन उगले, हवालदार प्रमोद पाटील, कासम शेख, सचिन राठोड, सुनिल गोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शिवूर पोलिस ठाण्याच्या अधिकारी-अंमलदारांनी केली.
घरातच टाकले पुरून
शिऊर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. दरम्यान, मिळालेल्या माहिती आधारे पोलिसांनी अवघ्या तीन तासांत मृताचा लहान भाऊ लहानू दिवेकर याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने कौटुंबिक व दिवेकर याचा 2 जानेवारी रोजी रात्री झोपेत असताना धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून खून केल्याची कबुली केले. त्यानंतर मृतदेह घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये खड्डा करून पुरून टाकल्याचे सांगितले.






