Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: वाद सोडवायला गेले, पण झाले बळी; विहिरीच्या वादातून एकावर चाकूने हल्ला; आरोपी ताब्यात

केज तालुक्यातील शिरूरघाट येथे विहिरीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या वादातून हिंसक घटना घडली. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सुंदर सांगळे यांच्यावर चाकू हल्ला झाला. एक गंभीर जखमी असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 31, 2026 | 08:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विहिरीच्या हिस्स्यावरून कौटुंबिक वाद
  • मध्यस्थी करणाऱ्यावर चाकूने हल्ला; एक गंभीर
  • आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून कारवाई
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीच्या वादातून नातेवाईकांमध्येच भांडण झाले. या भांडणात मध्यस्थी करायला गेलेला असता त्याच्याच पोटात चाकू खुपसल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. यात एक जण गंभीर जखमी झाले असून तर अन्य तिघे हे काठीच्या मारहाणीत जखमी झाले आहे. ही घटना केज तालुक्यातील शिरूरघाट येथे सोमवारी (३० मार्च) सकाळी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने फसवणूक; तक्रारदारांना वॉचमनला बोलवायला पाठविले अन्…

काय घडलं नेमकं?

शिरूरघाट येथील रहिवासी राजेंद्र उर्फ राजाभाऊ सुभाष सांगळे आणि त्याचे चुलते भीमराव रामभाऊ सांगळे यांच्यात शेतातील विहिरीच्या हिश्यावरून जुना वाद सुरु आहे. सोमवारी सकाळी १०:३० च्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. आरोपी राजेंद्र सांगळे याने त्याचे चुलते भीमराव यांना शिवीगाळ करत काठीने डोक्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान भीमराव याना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा मोहन सांगळे आणि भाऊ अर्जुन सांगळे धावून आले असता, आरोपीने त्यांनाही काठीने बेदम मारहाण केली. यावेळी शेजारी राहणारे सुंदर धनराज सांगळे हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेले. मात्र संतापलेल्या आरोपीने “तुझा काय संबंध?” असे म्हणत कमरेला असलेला चाकू काढून थेट सुंदर सांगळे यांच्या पोटात खुपसला.

या चाकू हल्लयात सुंदर सांगळे हे गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या घटनेनंतर आरोपी राजेंद्र हा तिथून फरार झाला. नातेवाईकांनी तातडीने जखमींना खाजगी वाहनाने बीड येथील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. सुंदर सांगळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

याप्रकरणी सुंदर सांगळे यांचे पुत्र बालाजी सांगळे यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, आरोपी राजेंद्र सांगळे याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फरार आरोपी राजेंद्र उर्फ राजाभाऊ सुभाष सांगळे याला अटक केली आहे.

वेळीच सावध व्हा! सायबर गुन्हेगारीत AI चा वापर, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणुकीचा प्रयत्न?

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा वाद कशावरून झाला?

    Ans: शेतातील विहिरीच्या वाटणीवरून वाद झाला.

  • Que: हल्ल्यात कोण जखमी झाले?

    Ans: सुंदर सांगळे यांच्यावर चाकू हल्ला झाला, ते गंभीर जखमी आहेत.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.

Web Title: Beed crime went to resolve a dispute but fell victim man attacked with a knife over well dispute accused taken into custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.