Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीडमध्ये दिवाळीत धक्कादायक घटना! तरुणाच्या छातीत गोळी लागून मृत्यू; हत्या की आत्महत्या यावर गूढ कायम

एका युवकाच्या छातीत गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला की त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली यावर गूढ कायम आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 19, 2025 | 07:39 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

बीड: ऐन दिवाळीत बीड जिल्ह्यात एक धक्कदायक घटना घडली आहे. एका युवकाच्या छातीत गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला की त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली यावर गूढ कायम आहे. ही घटना आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत घडली. मृत तरुणाचे नाव मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण असे आहे.

Pune News: लंडनच्या नोकरी प्रकरणात मॉडर्न कॉलेजचा मोठा खुलासा; प्रेम बिऱ्हाडेकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

याबाबत अधिक माहिती अशी, अंभोरा हिवरा रस्त्यावरील कच्च्या रस्त्यालगत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मयूरचा मृतदेह दिसून आला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी याचा अधिक तपास केला तेव्हा मयूरच्या छातीत गोळी लागण्याची जखम आणि मृतदेहाजवळ पडलेले पिस्तूल आढळून आले. मयूर चव्हाण हा मिस्त्री काम करत होता. त्यामुळे त्याच्याजवळ विनापरवाना पिस्तूल आले कुठून? त्याची हत्या आहे की आत्महत्या याबाबतचे गूढ कायम आहे. घटनेचा अधिक तपास अंभोरा पोलीस करत आहेत. मात्र ऐन सणासुदीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गंभीर मारहाणीचे दोन प्रकार बीडमध्ये! महिलेला डोक्याला 14 टाके, चायनिज सेंटरवर शस्त्र हल्ला

बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मारहाणीच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. शुल्लक कारणावरून अंजनवती गावात एका महिलेला गंभीर मारहाण करण्यात आली असून तिच्या डोक्याला तब्बल 14 टाके पडले आहेत. तर दुसऱ्या घटनेत केज शहरात चायनिज सेंटर चालविणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे.

अंजनवती गावात महिलेला गंभीर मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात याच गावात शेतीच्या वादातून एका महिलेला मारहाण झाली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा अंजनवतीत महिलेला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जखमी महिला प्रियंका गाढवे या असून, तिच्या डोक्याला शेतीच्या अवजाराने खोल जखम झाली आहे. सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर झाल्यानंतर पोलिस जबाब नोंदविणार आहेत.

दुसरीकडे, बीडच्या केज शहरात धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उशिरा रात्री घडली.सय्यद इर्शाद नावाचा युवक बसस्टँडसमोर चायनिज सेंटर चालवत असताना, चार ते पाच जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला.या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, प्राथमिक उपचारानंतर त्याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी सांगितले की, इर्शादचा जबाब घेतल्यानंतर केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला जाणार आहे.

Crime News: खून, खंडणी, विनयभंग अन्न…; गुन्ह्यांची यादीच संपेना; 2 सराईत गुन्हेगार सातारा-सांगलीमधून तडीपार

Web Title: Beed crime youth dies after being shot in the chest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 07:39 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
4

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.