Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: शाळा सुटली की सुरू व्हायचा शिक्षकाचा काळा खेळ; चौथीच्या मुलींच्या छळाने बीड हादरले

बीडच्या गेवराई तालुक्यात शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील चौथीच्या विद्यार्थिनींचा शिक्षकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अविनाश ढेरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 16, 2026 | 10:30 AM
Beed Crime: शाळा सुटली की सुरू व्हायचा शिक्षकाचा काळा खेळ; चौथीच्या मुलींच्या छळाने बीड हादरले

Beed Crime: शाळा सुटली की सुरू व्हायचा शिक्षकाचा काळा खेळ; चौथीच्या मुलींच्या छळाने बीड हादरले

Follow Us
Follow Us:
  • चौथीच्या विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून लैंगिक छळाचा आरोप
  • गेवराई पोलिसांकडून शिक्षक ताब्यात; पोक्सोसह गुन्हा दाखल
  • मुलीने आईला सांगितला प्रकार; कुटुंबीयांची पोलिसांत धाव
 

बीड : बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांची मालिका सुरू असतानाच गेवराई तालुक्यात शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा शिक्षकानेच लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अविनाश ढेरे याला गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यानंतर मुलींना थांबवत होता
पोलिसांच्या माहितीनुसार, अविनाश ढेरे हा गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनींना तो मधल्या सुट्टीत तसेच शाळा सुटल्यानंतर वर्गात थांबवून घेत असल्याचा आरोप आहे. याचदरम्यान त्याने मुलींशी अयोग्य वर्तन करून त्यांचा लैंगिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: गोरेगावात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू; सोबत होती १० वर्षांची मुलगी, सीसीटीव्हीमुळे गूढ वाढले

घरी परतल्यानंतर मुलीने आईला सांगितला प्रकार
या प्रकरणातील एका पीडित मुलीने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार आईला सांगितला. सायंकाळी पाचच्या सुमारास घरी आलेली मुलगी अत्यंत घाबरलेली होती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. आईने विचारपूस केल्यानंतर तिने शाळेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी थेट पोलिस ठाणे गाठून शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली.

शिक्षक पोलिसांच्या ताब्यात
तक्रारीनंतर गेवराई पोलिसांनी अविनाश ढेरे याच्याविरोधात पोक्सो कायद्यासह इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत केलेल्या कथित गैरवर्तनामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गेवराईमध्ये काय घडले?

    Ans: जिल्हा परिषद शाळेतील चौथीच्या विद्यार्थिनींचा शिक्षकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.

  • Que: आरोपीवर कोणत्या कायद्यानुसार कारवाई झाली?

    Ans: आरोपीविरोधात पोक्सो कायद्यासह इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: घटना कधी घडली?

    Ans: हा प्रकार १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Georai teacher sexual harassment fourth standard girls pocso case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • Beed crime News
  • POCSO
  • Sexual Assault Case

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: मुलीवर अत्याचाराचा गुन्हा मिटवण्यासाठी आईनेच मागितले ३९ लाख; २५ हजार घेताना रंगेहात अटक
1

Chhatrapati Sambhajinagar: मुलीवर अत्याचाराचा गुन्हा मिटवण्यासाठी आईनेच मागितले ३९ लाख; २५ हजार घेताना रंगेहात अटक

Crime News: आई-वडील जेवायला गेले अन् सहा वर्षांच्या चिमुरडीसोबत घडला धक्कादायक प्रकार
2

Crime News: आई-वडील जेवायला गेले अन् सहा वर्षांच्या चिमुरडीसोबत घडला धक्कादायक प्रकार

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
3

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

Beed Khandeshwari Yatra : बीड मधील खंडेश्वरी यात्रा महोत्सवात पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद
4

Beed Khandeshwari Yatra : बीड मधील खंडेश्वरी यात्रा महोत्सवात पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.