Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भर रस्त्यावर मित्रानेच घेतला मित्राचा जीव;तक्रारीत काय?

बीडमधून पुन्हा एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका स्थानिक पत्रकाराच्या मुलाची भररस्त्यावर चाकू भोसकून हत्या करण्यात आली. यश ढाका असे मृतकाचे नाव आहे. त्याचे वडील देवेंद्र ढाका (वय 45) हे पत्रकार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 27, 2025 | 01:51 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

बीड: बीडमधून पुन्हा एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका स्थानिक पत्रकाराच्या मुलाची भररस्त्यावर चाकू भोसकून हत्या करण्यात आली. यश ढाका असे मृतकाचे नाव आहे. त्याचे वडील देवेंद्र ढाका (वय 45 वर्षे रा. बलभीम नगर पेठ बीड) हे पत्रकार आहे. आता या घटनेने सुव्यवरथेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हि हत्या बीड येथील माने कॉम्पलक्स परिसरात करण्यात आली आहे. मित्राने बाचाबाचीत चूकीने छातीत सपासप वार करून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या यश ढाका याच्या वडिलांनी बीड ययेथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

Panvel Crime: पनवेल हादरलं! भावानेच भावाचा घेतला जीव, चुलत भावाच्या पत्नीशी संबंधांचा राग; नेमकं काय घडलं?

तक्रारीत काय म्हंटले आहे

पत्रकार देवेंद्र ढाका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्याचे कुटुंब बीड येथे वास्तव्यास असून ते खाजगी नोकरी करून घर चालवतात. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा यश ढाका (वय 20 वर्षे), लहान मुलगा युवराज देवेंद्रसिंग ढाका (वय 17 वर्षे) अशी दोन मुलं आहेत.

मी त्याला दुपारी फोन केले होते

देवेंद्र ढाका यांनी या प्रकरणी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी नेहमीप्रमाणे 25 सप्टेंबरला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कामानिमीत्त घराबाहेर पडलो. त्यावेळी माझा मुलगा यश हा घरीच होता दुपारी 02.45 वाजण्याच्या सुमारास मी मुलगा यश याला फोन करुन युवराज याला MIDC येथून घरी घेऊन येण्याबाबत सांगितलं असता यशने मला कळविले की माझ्याकडे गाडी नाही मी बाहेर आहे. यावर मी त्याला बोललो की ठीक आहे, मी दुसऱ्याला कोणाला तरी पाठवतो, असं म्हणून फोन कट केला. रात्री 08.30 वाजेच्या सुमारास बस स्थानक बीड येथे असताना मला माझे चुलत भाऊ अमरसिंग ढाका यांचा फोन आला आणि त्यांनी सांगीतले की यशवर माने कॉम्पलेक्स येथे वार झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर ते तात्काळ माने कॉम्पलेक्स बीड येथे पोहचले, गणेश वॉशिंग कंपनी समोर रोडवर माझा मुलगा यश हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

त्याचा शर्ट, पॅन्ट रक्ताने माखलेले

त्यावेळी त्याच्या आजुबाजुला लोकांची गर्दी जमली होती. मी त्याच्याजवळ जाऊन त्याला जवळ घेतले असता त्याचे छातीवर डाव्या बाजुस धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत होते व त्याचा शर्ट, पॅन्ट रक्ताने माखलेले होते. मी त्याच्याशी बरेच वेळा बोलण्याचा प्रयत्न केला परंतु तो काहीच बोलला नाही. तो पर्यंत त्याच्या मित्रांनी रुग्णवाहिका कॉल केलेला होता. तेव्हा तेथे त्याचे दोन मित्र हजर होते त्यांनी मला सांगितले की सुरज आप्पासाहेब काटे व त्याचे सर्व साथीदाराने यशला धारदार शस्त्राने वार केले आहेत. तेथे थोड्याच वेळात रुग्णवाहिका आली व आम्ही त्यास रुग्णवाहिकेतून सरकारी दवाखाना बीड येथे घेऊन गेलो, तेथे डॉक्टरांनी यशला तपासले आणि त्याचा मृत्यू झाला असल्याचे आम्हाला सांगितलं.

एकाला अटक तर चार आरोपी फरार

ढाका यांच्या तक्रारीनुसार बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एकूण पाच आरोपींवर 302अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे, एका आरोपीला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे. मात्र यातील आणखी चार आरोपी अद्याप ही फरार आहेत. या फरार आरोपींना ताब्यात घेण्यात यावे या करिता नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर भर पावसात तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन ही केले होते. मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यशच्या मारेकऱ्यांना शोधून अटक करू असे आश्वासन देखील दिले. यशच्या पश्चात त्याचा लहान भाऊ आई, वडील असा परिवार आहे.

Telangana Crime: तेलंगणात हत्येचा थरार! आईनेच केली दोन मुलांची निर्घृण हत्या, डायरीत लिहिली होती मृत्यूची कहाणी; का केली हत्या?

Web Title: Beed shaken again journalists son brutally murdered in beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Telangana Crime: तेलंगणात हत्येचा थरार! आईनेच केली दोन मुलांची निर्घृण हत्या, डायरीत लिहिली होती मृत्यूची कहाणी; का केली हत्या?
1

Telangana Crime: तेलंगणात हत्येचा थरार! आईनेच केली दोन मुलांची निर्घृण हत्या, डायरीत लिहिली होती मृत्यूची कहाणी; का केली हत्या?

Panvel Crime: पनवेल हादरलं! भावानेच भावाचा घेतला जीव, चुलत भावाच्या पत्नीशी संबंधांचा राग; नेमकं काय घडलं?
2

Panvel Crime: पनवेल हादरलं! भावानेच भावाचा घेतला जीव, चुलत भावाच्या पत्नीशी संबंधांचा राग; नेमकं काय घडलं?

Pune Crime : दिवसा बँक अधिकारी, रात्री मटक्याचा बुकी; पुण्यातील बँक कर्मचाऱ्यासह १७ जण अटकेत
3

Pune Crime : दिवसा बँक अधिकारी, रात्री मटक्याचा बुकी; पुण्यातील बँक कर्मचाऱ्यासह १७ जण अटकेत

Mumbai Crime: मुंबईत दांडियाचा जल्लोष राड्यात बदलला; 19 वर्षीय मुलाचं नाक फोडलं, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
4

Mumbai Crime: मुंबईत दांडियाचा जल्लोष राड्यात बदलला; 19 वर्षीय मुलाचं नाक फोडलं, खासदार रवींद्र वायकर आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.