तेलंगाण्यातून एक धक्कदायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. एकाला तलावात बुडून मारलं तर एकावर धारदार शस्त्राने वार करून मारलं. एवढेच नाही तर मुलांच्या हत्येची डायरी देखील लिहिली होती.हत्येनंतर दिशाभूल करण्यासाठी त्यांच्या हत्येची खोटी कहाणी रचली. मात्र, एका छोट्याशा सुगाव्यामुळे तीच कांड समोर आलं. तिला अटक करण्यात आली असून तिला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
नेमकं काय प्रकरण?
ही घटना महाबुबाबाद जिल्ह्यातील केसमुद्रम मंडलमधील नारायणपुरम गावातील आहे. आरोपीचा नाव सिरीशा असे आहे. तिचे उपेंद्र या नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. त्यांना तीन मुले होती. त्यांच्या सर्वात धाकट्या, दोन महिन्यांच्या नेहल नावाच्या बाळाचा १५ जानेवारी रोजी घराजवळील तलावात पडून मृत्यू झाला. त्या मुलाचा मृत्यू अपघाती आहे असेच सर्वांना वाटले. मात्र एका महिन्यापूर्वी, मोठा मुलगा मनीष कुमारवरही प्राणघातक हल्ला झाला. घरी आईच्या शेजारी झोपलेला असतांना मनीषच्या मानेवर वार करण्यात आला.
त्यानंतर त्याला त्याच्या आईने रुग्णालयात घेऊन गेले. आईने तक्रार केली की काही अज्ञात लोकांनी तिच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने तो या हल्लयातून वाचला. मात्र काही दिवसांनी म्हणेजच 24 सप्टेंबरला रात्री त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. धाकट्या मुलाच्या मृत्यूनंतर आठ महिन्यातच मोठा मुलगाही मरण पावला. ज्यामुळे कुटुंब आणि संपूर्ण गाव हादरून गेले. मनीषला कोणी मारले हे स्पष्ट न झाल्याने संपूर्ण गाव घाबरले होते. दोन मुलांना गमावल्यामुळे गावकऱ्यांना आईवर दया आली.
हत्या करून आत्महत्या
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि त्यांनी तपास सुरु केला. पण तपासात जे समोर आलं त्याने संपूर्ण गावाला धक्काच बसला. मुलांच्या आईनेच दोन्ही मुलांची हत्या केल्याचे समोर आले. ही तिन्ही मुलांची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या करण्यात होती. कारण तिचा नवरा मद्यपी होता आणि पती विवाहबाह्य संबंधांमुळे तिला त्रास देत होता.
डायरीत काय?
ती तिन्ही मुलांना मारून आत्महत्या करणार होती. तिने तिच्या डायरीत तिन्ही मुलांच्या हत्येचा प्लान लिहिला होता. तिने आधीच दोघांना मारले होते आणि तिसऱ्या मुलालाही मारण्याची योजना आखत होती. पण त्याचदरम्यान पोलिसांनी सत्य उघड केले. अखेर पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून पुढील कारवाई करत आहे.
Mumbai News: विक्रोळीतील धक्कादायक प्रकरण, मृत घोषित झालेली महिला सापडली जिवंत; काय नेमकं प्रकरण?