Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकमेकींच्या प्रेमात होत्या दोन मैत्रिणी; समाजाचे टोमणे अन् मुलांशी लग्न करण्याचा दबावाला कंटाळत घेतला टोकाचा निर्णय

बंगळुरुतील येलाहंका परिसरात दोन तरुणींच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. दोघीही एकमेकींच्या प्रेमात होत्या आणि कुटुंबीयांकडून लग्नासाठी दबाव असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2026 | 09:51 AM
एकमेकींच्या प्रेमात होत्या दोन मैत्रिणी; समाजाचे टोमणे अन् मुलांशी लग्न करण्याचा दबावाला कंटाळत घेतला टोकाचा निर्णय

एकमेकींच्या प्रेमात होत्या दोन मैत्रिणी; समाजाचे टोमणे अन् मुलांशी लग्न करण्याचा दबावाला कंटाळत घेतला टोकाचा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमधील सिरजना आणि रिता या दोघी रिलेशनशिपमध्ये होत्या.
  • कुटुंबीयांनी नात्याला विरोध करत दोघींवर मुलांशी लग्न करण्यासाठी दबाव टाकल्याचे समोर आले.
  • येलाहंका परिसरात दोघींचे मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
बंगळूरुतील येलाहंका परिसरातून दोन तरुणींच्या आत्महत्येची घटना समोर येत आहे. दोघींचाही मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. प्राथमिक तपासानुसार, मृत्यू गळफास घेतल्याने झाला आणि दोन्ही तरुणी या एकमेंकींसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यांच्या या नात्याला कुटुंबाकडून मान्यता मिळाली नाही. कुटुंबाकडून मुलींवर मुलासोबत लग्न करण्याचा दबाव दिला जात होता. इतकंच नाही तर त्यांना दूर करण्यासाठी कुटुंबीयांनी त्यांना नेपाळहून बंगळूरला आणले होते. परंतु एकमेकींसाठीचे हे प्रेम इतके वाढले होते की त्यांना वेगळं करणंही यापुढे असफल ठरलं. समाजाची भिती आणि कुटुंबाकडून येणारा दबाव या सर्वांना कंटाळून दोघींनीही आत्महत्येचा निर्णय घेतला. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांना ताब्यात घेतलं असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक ! नोकरीच्या आमिषाने विवाहितेचा छळ; थेट पोर्तुगालमध्ये नेऊन विक्री केली, महिलेने मात्र…

नेपाळहून बंगळूरला आणलं…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणींची नावे सिरजना आणि रिता अशी आहेत. सिरजनाचे वय २२ वर्षे होते तर रीताचे वय २३ वर्षे होते. दोघीही नेपाळच्या रहिवाशी होत्या. लहानपणापासूनच दोघी एकत्र मोठ्या झाल्या. सोबत शिक्षण घेताना दोघांमधील जवळीक वाढली. वेळेसोबत त्यांच्यातील ही जवळीक जास्त वाढली आणि याचे प्रेमात रुपांतर झाले. गावातील लोकांना जेव्हा त्यांच्या रिलेशनशिपविषयी समजले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांच्यावर टिका करायचा सुरुवात केली. कुटुंबानेही या समलैंगिक नात्याचा स्वीकार करण्यास नकार दिला. दोघींनाही वेगळं करण्याच्या उद्देशाने एक महिन्याआधी दोघींनाही नेपाळमधून बंगळुरु येथे आणण्यात आलं. रिता फ्रेजर टाउनमध्ये राहत होती तर सिरजना जक्कूर परिसरात राहत होती. कुटुंबाला वाटले की दूर राहिल्याने त्यांच्यातील जवळीक कमी होईल.

वेगळं केल्यानंतरही दोघी एकमेकींना भेटत होत्या

बंगळुरुत वेगवेगळ्या राहत असतानाही सिरजना आणि रीतामधील प्रेम कमी झाले नाही. आठवड्यातील तीन ते चार दिवस त्या गुपचूक एकमेकींना भेटायच्या. या भेटीदरम्यानच कुटुंबाने त्यांच्यावर लग्नाचा दबाव टाकायला सुरुवात केली. कुटुंबाचे स्पष्ट मत होते की, समाज त्यांच्या या नात्याला कधीही स्वीकृती देणार नाही. दोन्ही कुटुंबानी चांगला मुलगा बघून त्यांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला होता. यावरुनच दोघी तणावात होत्या. आपले आयुष्य अंधारात जाणार आणि आयुष्यभर एकमेकींशी लांब राहावं लागणार, नातं तुटणार या सर्व विचारांनी त्या नैराश्यात गेल्या आणि दोघींनीही आयुष्य संपवून टाकण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी, येलहंका येथील जक्कूर रोडवरील एका हॉटेलसमोरील झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळले.

धडा शिकवण्यासाठी रचला कट… आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, विटांनी ठेचून केली निर्घृण हत्या

पोलिसांच्या हाती लागले खुलासे

स्थानिकांनी जेव्हा झाडाला दोन तरुणींना मृतदेह लटकताना पाहिला तेव्हा त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. येलाहंका पोलिस स्थानकातून अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी मृतदेहाला झाडावरुन खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला असून दोन्ही मुलींसंंबंधित आवश्यक माहिती गोळा केली जात आहे. पोलिसांना सांगितले की, बंगळूरुमध्ये आल्यानंतर त्या दोघीही सिरजनाच्या भावाच्या घरी भेटल्या होत्या. पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल केला असून दोन्ही कुटुंबाकडून जबाब नोंदवून घेतले जात आहे. आत्महत्येच्या दिवशी नेमके काय घडले, हे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करत असून आत्महत्येचे नक्की कारण काय याचा छडा लावण्यासाठी प्रकरणाचा सर्व बाजूंनी विचार केला जात आहे.

Web Title: Bengaluru yelahanka two women death relationship family marriage pressure nepal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • Attempt to Suicide
  • Bengaluru
  • crime news

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
1

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल
2

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई
3

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन
4

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.