Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara Crime: संतापजनक! 3 वर्षीय बालिकेला आमिष दाखवून सार्वजनिक शौचालयात नेलं; आणि…, आज ‘भंडारा बंद’

भंडाऱ्यात 3 वर्षीय बालिकेला आमिष दाखवून सार्वजनिक शौचालयात नेऊन अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. बालिकेच्या आरडाओरडीनंतर नागरिकांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. या घटनेनंतर शहरात तीव्र संताप उसळला असून आज 'भंडारा बंद'ची हाक देण्यात आली आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई आणि फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याची मागणी होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 07, 2026 | 10:02 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • भंडाऱ्यात 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार; आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
  • मेडिकल कॉलेजमध्ये तणावपूर्ण वातावरण; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी.
  • घटनेच्या निषेधार्थ आज ‘भंडारा बंद’; फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी.
भंडारा: भंडारा शहरात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकल्या बालिकेला आमिष दाखवून सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. घटनेच्या निषेधार्थ आज ‘भंडारा बंद’ ची हाक देण्यात आली असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची आणि या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्याची जोरदार मागणी होत आहे.

Uttarpradesh Crime: ‘तू दुसऱ्याशी का बोलतेस?’… संशयातून 17 वर्षीय विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या; प्रियकर अटकेत

नेमकं काय घडलं?

भंडारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डात गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. आरोपीचे नाव रोहित वासनिक (वय ३०) असे आहे. रोहितने त्या ३ वर्षीय चिमुकलीला आमिष दाखवून तिला सार्वजनिक शौचालयात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चिमुकलीने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक तिथे उपस्थित झाले. त्यांनी प्रसंगावधान राखत नराधमाला जागेवरच पकडले आणि त्याला चांगलाच चोप दिला. संतप्त जमावाच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात आरोपीने स्वतःला टाइल्सच्या तुकड्याने मारहाण करून जखमी करून घेतले.

यानंतर पीडित चिमुकलीला आणि जखमी नराधमाला उपचारासाठी भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती संपूर्ण भंडारा शहरात वाऱ्यासारखी पसरली. तेव्हा भंडारवासी मेडिकल कॉलेज परिसरात जमा झाले. नराधम आरोपीवर उपचार करू नका आणि त्याला तात्काळ नागरिकांच्या स्वाधीन करा, अशी आक्रमक भूमिका घेत संतप्त नागरिकांनी थेट रुगालयात ठिय्या मांडला.

रुग्णालय परिसरात तणाव

जवळपास 7 तास मेडिकल कॉलेज परिसरात अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भंडारा शहरासह पोलीस मुख्यालय, राखीव पोलीस दल आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतून अतिरिक्त पोलीस कुमक तातडीने तैनात करण्यात आली. वाढता तणाव पाहता प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक मोरे, उपविभागीय अधिकारी तिखे आणि मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. दुधगावकर यांनी संतप्त नागरिकांशी सविस्तर चर्चा केली. आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आणि त्याला कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास नागरिकांचा रोष शांत झाला.

आज ‘भंडारा बंद’ची हाक

या दुर्दैवी प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात (Fast Track Court) चालवण्यात यावा, तसेच आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने घेऊ नये, या मागणीसाठी आज भंडारा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठ आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे.

‘फटाका’ सायलेन्सरवाल्यांनो सावधान! पुणे पोलिसांचा धडाका, तीन दिवसांत तब्बल…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: भंडारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डात.

  • Que: आरोपीला कसे पकडण्यात आले?

    Ans: बालिकेच्या आरडाओरडीनंतर नागरिकांनी आरोपीला पकडले.

  • Que: या घटनेनंतर कोणती प्रमुख मागणी करण्यात आली?

    Ans: फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची.

Web Title: Bhandara crime outrageous 3 year old girl lured and taken to a public toilet and bhandara bandh today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • Bhandara
  • Bhandara crime
  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.